शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:40 IST

खंडाळा : ‘सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात देशात उल्लेखनीय काम केले आहे. शेतकºयांसाठी पारदर्शक काम करणाºया बँकेची चौकशी राज्य सरकार करते आहे. चोºया करणारे मोदी परदेशात मोकाट फिरतात. मात्र, दुष्काळात छावण्या उभारून पशुधन वाचविणारे चौकशीच्या फेºयात अडकतात,’ अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.लोणंद येथे आयोजित ...

खंडाळा : ‘सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात देशात उल्लेखनीय काम केले आहे. शेतकºयांसाठी पारदर्शक काम करणाºया बँकेची चौकशी राज्य सरकार करते आहे. चोºया करणारे मोदी परदेशात मोकाट फिरतात. मात्र, दुष्काळात छावण्या उभारून पशुधन वाचविणारे चौकशीच्या फेºयात अडकतात,’ अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.लोणंद येथे आयोजित शरद कृषी महोत्सव व प्रदर्शनात शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस पाच दशके पूर्ण झाल्याबद्दल आयोजित गौरवप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, सुभाषराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, ‘सत्तेचा वापर शेवटच्या घटकातील माणसांसाठी अखंडपणे करायचा असतो, ही आमची शिकवण आहे. सरकारने खुशाल चौकशी करावी. आम्ही सर्वसामान्य माणसांशी बांधिलकी सोडणार नाही. सध्याचे राज्य सरकार चौकशीवर खूप प्रेम करणारे आहे. त्यामुळे हे सरकार कुणासाठी आलंय हेच कळत नाही.’रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘शरद पवार हे लोकांमध्ये जाऊन काम करणारे, शेतकºयांबद्दल कणव असणारे नेते आहेत. राज्यात शेतकºयांना रुचणारं राजकारण राहिलेलं नाही. शेतकºयांच्या अस्तित्वाचे प्रश्न तयार झाल्याने तो टिकवायचा असेल तर शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही.’