शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मोठे बाप्पा कायमस्वरूपी; छोटी मूर्ती विसर्जनाला!

By admin | Updated: September 5, 2014 00:19 IST

‘लोकमत’च्या प्रयत्नांना यश : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने साताकरांचे पाऊल...

सातारा : काळानुरूप होत असलेल्या बदलाचे वारे गणेशोत्सवालाही लागले आहे. उत्सवाबरोबरच गणेशमूर्तींनीही वेगळी ‘उंची’ गाठली आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनात अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती, केमिकलयुक्त रंग यांमुळे पाण्याचे प्रदूषण होऊन त्याचा माणूस आणि जलचरांनाही धोका निर्माण होत आहे. मूर्तीची हेळसांड होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘बाप्पांचे पावित्र्य जपू या’ सदराच्या माध्यमातून प्रबोधन केले. परिणामस्वरूप शहरातील अनेक मंडळांनी यंदापासून मोठ्या गणेशमूर्ती विसर्जित न करता ती कायमस्वरूपी ठेवण्याचा व छोट्या मूर्ती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.जकातवाडीतील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाने १९ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्तीचे विसर्जन न करता ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. ६ रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.शहरातील राजमुद्रा गणेशोत्सव मंडळानेही या वर्षीपासून गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ फूट उंच आणि सिंहासनाधिष्ठित सुबक मूर्ती आहे. उत्सवानंतर ही मूर्ती एका गोडावूनमध्ये सुरक्षित ठेवली जाणार आहे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असून दरवर्षी जमा होणाऱ्या वर्गणीतून पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी काम करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष केदार राजेशिर्के, उपाध्यक्ष चिंतामणी महाबळेश्वरकर यांनी सांगितले. मूर्तिकार संतोष कुंभार यांनी ही मूर्ती बनविली आहे. उत्सवानंतर त्यांच्याकडेच शेडमध्ये मूर्ती ठेवली जाणार आहे. सम्राट गणेशोत्सव मंडळ दरवर्षी सर्वांत मोठ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करते. या वर्षीही १८ फूट उंचीच्या मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीचे तळ्यात विसर्जन केले जाते. मात्र, यापुढे या मंडळानेही मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वर्षी नव्याने रंगकाम करून एकच मूर्ती प्रतिवर्षी बसविणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.शनिवार पेठेतील नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळानेही गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळाने यंदा २० फुटी गणेशमूर्ती बसविली आहे. मूर्ती ठेवण्यासाठी शेड तयार केले जाणार असल्याचे अध्यक्ष अमर परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘चला बाप्पांचं पावित्र्य जपू या’ सदरामुळे सातारकरांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात जागृती निर्माण झाली आहे. ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होऊन त्याचा भविष्यात केवढा धोका निर्माण होऊ शकतो, हे आता सातारकरांना कळून चुकले आहे. दरवर्षी शहरातील तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जन होत असल्यामुळे पाण्याचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होऊन पाण्यातील मासे व इतर जलचरांचे जीवन संपुष्टात येत असल्याची उदाहरणे घडली आहेत. मूर्ती विसर्जनानंतर तळ्यांची स्वच्छता हा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. यासाठी लाखो रुपयांचा निधी पालिकेला खर्ची घालावा लागतो, शिवाय तळ्यांच्या परिसरातील लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर येतो. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या गंभीर समस्येकडे डोळसवृत्तीने पाहण्याचे आवाहन केले अन् त्याला सातारकरांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यात जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर मोहिते, उपाध्यक्ष तुषार मोहिते आणि सदस्यांनी १९९१ मध्ये गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून गणेशोत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. येथून पुढेही जमा होणाऱ्या वर्गणीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करणार आहे. -विकास यादव, सदस्य