शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांना थोपविण्यासाठी वाईत ‘महाआघाडी’!

By admin | Updated: January 21, 2016 00:26 IST

असंतुष्ट नगरसेवकांवर नजर : पालिका निवडणुकीपूर्वी जोरदार राजकीय हालचाली; इच्छुकांची मोर्चेबांधणी

संजीव वरे -- वाई  पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची ऐन थंडीतही राजकीय कसरत सुरू झाल्याने शहराचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी तिर्थक्षेत्र आघाडीला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी पारंपरिक विरोधक असलेल्या जनकल्याण आघाडीबरोबरच आता भाजप-शिवसेना-रिपाइंने दोन्ही आघाड्यातील असंतुष्ट नगरसेवकांना बरोबर घेऊन तिसरी ‘महाआघाडी’ तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्वात संघर्ष समितीची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.वाई नगरपालिकेत सध्या आमदार मकरंद पाटील याचे नेतृत्व मानणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या तीर्थक्षेत्र आघाडीची सत्ता आहे. तर माजी आमदार मदन भोसले यांचे नेतृत्वाखालील जनकल्याण आघाडी विरोधी बाकावर काम करीत आहे. शेवटच्या कालावधीत तीर्थक्षेत्र आघाडीने आपला नगराध्यक्ष न बदलता पालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करून शहराचा विकास, रस्ते, वैकुंठ स्मशानभूमी असे मोठे प्रकल्प मार्गी लावल्याचा संदेश वाईकरांपर्यंक पोहोचविला आहे. सत्ताधारी तिर्थक्षेत्र आघाडीतही अनेक गटतट व मतभेद आहेत. अनेकदा हे चौथऱ्यावरही आले आहेत. परंतु अंतिम क्षणी आमदारांचाच शब्द मानला जातो, हे ही खरे आहे.वाई शहरात सध्या प्रारूप आराखड्याच्या आरक्षणा विरोधात विरोधी जनकल्याण आघाडीने व संघर्ष समितीने चांगलेच रान उठविले असून, सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांच्या कालावधीत विरोधकांच्या कामगिरीविषयी वाईकर समाधानी नाहीत. कृष्णा नदी प्रदूषण, महागणपती घाटावरील पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, शहरातील वाहतूक व्यवस्था अशा कितीतरी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. याचा असंतोषही नागरिकांच्या मनात आहे. शहराच्या विविध प्रश्नांवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे बरेच राजकीय पाणी कृष्णेच्या पुलाखालून जाणार आहे. इच्छुकांच्या गुडघ्याला बाशिंग!आगामी काही महिन्यांत होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनेक इच्छुक उमेदवारांच्या राजकीय कसरती सुरू झाल्या आहेत. शहरात आता वाढदिवसाचे कार्यक्रम, राजकीय चर्चा, बैठका यांचा सपाटा सुरू झाला आहे. विरोधक व संघर्ष समितीच्या आव्हानाला सत्ताधारी कसे सामोरे जातात, हे ही आगामी काळात पाहावयास मिळणार आहे. संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लक्ष विरोधी जनकल्याण आघाडी तसेच दोन्ही आघाडीत तीन असंतुष्ठ नगरसेवक आणि केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजप-शिवसेना व रिपाइं या सर्वांची तिसरी महाआघाडी निर्माण करण्यात संघर्ष समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नाट्यमय राजकीय घडामोडीत वाईकर नागरिक काय भूमिका घेतात? याचे उत्तर मात्र वेळेनुसार समोर येईल.