फलटण : येथील फलटण सायकल असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनी ‘सायकल चालवा व आरोग्य टिकवा’ हा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. फलटणमधील १८ वर्षांच्या पुढील सायकलस्वारांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सायकल रॅलीचा प्रारंभ दि.२६ जानेवारी रोजी सकाळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते शहरातील डीएड चौक येथून होणार असून, यावेळी फलटण शहरातील ८५ वर्षांचे ज्येष्ठ सायकलपटू तात्यासाहेब घनवट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही रॅली डीएड चौक-जिंती नाका मार्गे कमिन्स गेट व परत फिरून डीएड चौक येथे येऊन माळजाई परिसरात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रॅलीचा समारोप होईल. फलटणकरांनी या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
फलटणमध्ये आज सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST