शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भोसरे, बिदालला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध/दहिवडी : पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सहभागी गावांनी जलसंधारणाची कामे जीव तोडून केली. यामध्ये खटाव तालुक्यातील भोसरे व माण तालुक्यातील बिदाल येथील ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झाले. दोन्ही गावांना अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकाची बक्षिसे विभागून मिळाली. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये आनंदोत्सव साजरा होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध/दहिवडी : पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सहभागी गावांनी जलसंधारणाची कामे जीव तोडून केली. यामध्ये खटाव तालुक्यातील भोसरे व माण तालुक्यातील बिदाल येथील ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झाले. दोन्ही गावांना अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकाची बक्षिसे विभागून मिळाली. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे.बालेवाडी, पुणे येथे रविवारी रात्री वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. स्पर्धेतील प्रथम क्रमांक वर्धा जिल्ह्यातील काकडदरा या गावास मिळाले आहे. काकडदरा गावाने ५० लाखांचे बक्षीस पटकाविले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नीता अंबानी, अभिनेता शहारूख खान प्रमुख उपस्थितीत होते. अभिनेता आमिर खान आणि किरण हे स्वाइन फ्लू झाल्याने कार्यक्रमास अनुपस्थित होते. आमिर खान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाला. त्यानेच ही माहिती दिली.बक्षीस मिळणार याची खात्री असल्याने भोसरे आणि बिदाल या दोन्ही गावांतील ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते. स्पर्धेत दुसºया क्रमांकाचे बक्षीस खटाव तालुक्यातील भोसरे गावाला विभागून मिळाले. पंधरा लाखांचा धनादेश, सन्मानचिन्ह या गावाला मिळाले. तसेच माण तालुक्यातील बिदाल या गावाला तिसºया क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. या गावाला दहा लाखांचा धनादेश व सन्मानचिन्ह मिळाले. ही आनंदवार्ता दोन्ही गावांत समजताच फटाके वाजवून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.