शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

भोसलेंच्या ‘सहकार पॅनेल’ने फुंकले रणशिंग

By admin | Updated: March 30, 2015 00:19 IST

कृष्णा कारखाना : किल्ले मच्छिंद्रगडावर प्रचार व सभासद संपर्क अभियानाचा प्रारंभ

कऱ्हाड : येडेमच्छिंद्र, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या येत्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने रविवारपासून प्रचाराचे रणशिंग फुंकले. डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते किल्ले मच्छिंद्रगडावर मच्छिंद्रनाथाला नारळ वाढवून आणि येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा आणि सभासद संपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सहकार महर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या काळात कृष्णा कारखान्याला लाभलेला वैभवशाली काळ पुन्हा आणण्यासाठी सर्व सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन केले. सकाळी दहाच्या सुमारास डॉ. सुरेश भोसले यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांसमवेत किल्ले मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथाची विधिवत पूजा केली. त्यानंतर येडेमच्छिंद्र येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसलेंनी कृष्णा कारखान्याला स्थैर्य प्राप्त करून दिले होते. त्यांच्या काळात त्यांनी केवळ कारखान्याचाच विकास केला नाही, तर भागाचे आणि सभासदांच्या प्रगतीलाही चालना दिली. हाच वैभवाचा काळ पुन्हा आणण्यासाठी आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.’ ‘सहकारात राजकारण बाजूला ठेवून आपण कार्यरत राहिलो तर सहकाराचा विकास होतोच; पण कारखान्यात १९८९ नंतर राजकारणाचा शिरकाव झाल्याने कारखान्याची पत हळूहळू ढासळत गेली. केवळ साखरेवर कारखानदारी चालणार नाही, तर उपउत्पादनेही घेण्याची गरज आहे, याचे महत्त्व जयवंतराव भोसलेंनी ओळखले होते. ज्या कारखान्याकडे वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे, याशिवाय डिस्टिलरी, इथेनॉलनिर्मिती करण्याची क्षमता आहे. तेथील शेतकरी सभासदांना मोठा मोबदला देणे शक्य आहे. कृष्णा कारखान्याच्या या जमेच्या बाजू असूनही गेल्या दहा वर्षांत याबाबत योग्य तऱ्हेचा विचार व कृती न झाल्याने सभासदांचे हित दुर्लक्षिले जात आहे. सभासदांचे हित महत्त्वाचे मानल्याने आम्ही सत्ता नसताना कधीच कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी सभासदांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठीच प्रयत्न केले. येत्या निवडणुकीत आम्ही उमेदवार निवडीची जबाबदारी गावांवर सोपविली आहे. गावाने एकीने दिलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देणार आहोत.’माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांतील कारखान्याची वाटचाल पाहता यंदा बदल निश्चित आहे. आपल्याला स्वार्थासाठी पाच वर्षे निवडणून येणारे लोक आता सत्तेवर नको आहेत, तर ज्या जयवंतराव भोसलेंनी ३०-३५ वर्षे कारखान्याला भरभराटीचा काळ दिला, अशा विचारांना आता आपल्याला सत्तेवर आणायचे आहे. ’ बी. जी. पाटील म्हणाले, ‘सहकारासाठी जयवंतराव भोसलेंनी कृष्णा कारखान्याच्या रूपाने उभारलेल्या या स्मारकाला पुन्हा वैभवाचा काळ आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.’तांबवे येथील एल. एम. पाटील म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांच्या काळात कारखान्याच्या संचालक मंडळापासून अन्य बैठकांच्या नियोजनाचे काम हे बाह्यशक्तीच्या माध्यमातून झाले आहे. विद्यमान अध्यक्ष दुसऱ्याच्या सल्ल्याने काम करत असल्याने ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था कारखान्याची झाली आहे.’ माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, बाबासाहेब शिंंदे, श्रीरंग देसाई, पैलवान अप्पासाहेब कदम, दादासाहेब रसाळ यांचीही भाषणे झाली. यावेळी अप्पा नेर्लेकर, सर्जेराव पाटील, महिपतराव पाटील, एम. के. कापूरकर, सरपंच संजय पाटील, दयानंद पाटील, डॉ. राजेंद्र पवार, आनंदराव मोहिते, संजय पवार, संदीप मोहिते, बापूराव पवार, दामाजी मोरे, जगदीश पाटील, हणमंतराव पाटील, निवास पवार, बाळासाहेब पाटील आदींसह कार्यकर्ते आणि सहकार पॅनेल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)