शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कुमठेत भोंदू महिलेचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 23:39 IST

अंनिस-पोलिसांची कारवाई : महाराष्ट्र-कर्नाटकात जाळे; भाविकांची लुबाडणूक

तासगाव : करणी, भूतबाधा, सातीआसरा यासारखे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अघोरी प्रकार करणाऱ्या कुमठे (ता. तासगाव) येथील मंगल पांडुरंग बडेकर (वय ६२) या भोंदू महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि तासगाव पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. या महिलेच्या कारनाम्यांचे जाळे महाराष्ट्रासह कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात असून, तिच्याकडे येणाऱ्या लोकांची हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंत लुबाडणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.कुमठे येथील मंगल बडेकर ही महिला देवीच्या नावाच्या आधारे अंधश्रद्धा पसरविणारे उपाय करते व त्यासाठी ती पैसे घेत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे आली होती. त्याची दखल घेत समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविक म्हणून या महिलेशी संपर्क साधला. प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी तिच्या घरी मोठा दरबार भरतो. या दरबारात जाऊन कार्यकर्त्यांनी मूल होत नाही, सासू त्रास देते, यावर उपाय सांगा, अशी विनवणी केली. त्यावर मंगल बडेकर हिने, सात शुक्रवार करा, परडी बांधून देईन, ती अमावास्येच्या रात्री नदीत सोडा. त्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. ‘मूल होण्यासाठी सातीआसराचे बंधन बांधून देईन, ते काढून देण्याची रक्कम नंतर सांगेन’, असेही तिने सांगितले. हे उपाय योजण्यासाठी बुधवारी भेटतो, असे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी तिला सांगितले होते. दरम्यान, तिच्याविरोधात तासगाव पोलिसांत ‘अंनिस’चे कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, मधुकर पवार, प्रियांका तुपलोंढे, ज्योती अदाटे, जावेद पेंढारी, राणी कदम, पूर्ती पाटील यांनी तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संबंधित महिलेच्या घरी छापा टाकला. (वार्ताहर)