शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भरतीच्या आमिषाने चार लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:25 IST

कोरेगाव : सैन्यात भरतीचे आमिष दाखवून बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिवडी येथील महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमीचा चालक राजकुमार बजरंग काटकर (रा. कुकुडवाड) व नीता डोंबे (रा. शिरसवडी, ता. खटाव) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार ...

कोरेगाव : सैन्यात भरतीचे आमिष दाखवून बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिवडी येथील महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमीचा चालक राजकुमार बजरंग काटकर (रा. कुकुडवाड) व नीता डोंबे (रा. शिरसवडी, ता. खटाव) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार काटकर याच्यासमवेत ओळख झाली, त्याने ‘दहिवडी येथे करिअर अ‍ॅकॅडमी चालवत असून, सैन्य दलामध्ये मुलांना भरती करतो,’ असे सांगितले. कदम यांनी चुलत बंधू राजेंद्र हरिश्चंद्र कदम यांना काटकर याची ओळख सांगत, तो सैन्य दलामध्ये मुलांना भरती करत असल्याचे सांगितले. राजेंद्र यांना मुलगा निरंजन याला सैन्य दलात भरती करावयाचे असल्याने त्यांनी घरात सर्वांशी चर्चा केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०१६ रोजी राजकुमार काटकर हा नीता डोंबे हिला बरोबर घेऊन बोरजाईवाडीत आला.तेथे सविस्तर चर्चा झाल्यानंतर काटकर याने निरंजन याला सैन्य दलात भरतीसाठी चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अ‍ॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये आणि कॉल लेटर आल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे राजेंद्र कदम यांनी बँक आॅफ महाराष्टÑ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून रक्कम काढून काटकर याच्याकडे दोन लाख रुपये दिले.त्यानंतर काटकर याने वारंवार पैशांसाठी तगादा लावला. मात्र कॉल लेटर आल्याशिवाय पैसे देणार नसल्याचे कदम यांनी सांगताच, दि. १४ सप्टेंबर २०१७ रोजी काटकर व डोंबे यांनी राजेंद्र कदम व निरंजन कदम यांना तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील एमसीई, एमई येथील प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेले. तेथे आण्णा नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. त्याने १५ दिवसांत कॉल लेटर येईल, असे सांगितले. त्यानंतर दि. १५ आॅक्टोबर २०१७ च्या दरम्यान काटकर याने बोरजाईवाडीत येऊन निरंजन याला प्रशिक्षणाला पाठवायचे आहे, असे सांगितले. राजेंद्र कदम यांनी सोसायटीतून कर्ज काढून १ लाख रुपये आणि मेहुणे नितीन पवार यांच्याकडून १ लाख रुपये घेतले. दोन लाख रुपये त्यांनी काटकर याला दिले. त्यानंतर काटकर हा परत आलाच नाही.मोबाईल कॉल घेणेही बंदत्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी संपर्क साधून सैन्य भरतीबाबत विचारणा केल्यावर ‘तुमचे काम लवकरच होणार आहे,’ असे तो सांगत होता. त्यानंतर त्याने मोबाईलवर कॉल घेणे बंद केले.