शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

संवादात भारावली तरुणाई...

By admin | Updated: July 25, 2016 23:07 IST

भरगच्च कार्यक्रम : नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही केली चर्चा

सातारा : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी जिल्हा पोलिस मुख्यालयात संवाद साधण्यासाठी सोमवारी तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. आयोगाच्या परीक्षा द्या, उद्या तुमची सही कोणी मागितली पाहिजे, असं काम करून दाखवा, अशा ओजस्वी शब्दांमुळे तरुणाई भारावून गेली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यावेळी उपस्थित होते.नांगरे-पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर ते प्रथमच साताऱ्यात आले. त्यांच्या दौऱ्याची उत्सुकता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होती. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी शिवतेज हॉलमध्ये पोलिस अधिकाऱ्यांशी क्राईम मीटिंग घेतली. अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यांनी दुपारनंतर पोलिस करमणूक केंद्रामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबतही त्यांनी जाणून घेतले. सायंकाळी पोलिस अधीक्षकांच्या दालनात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच कॉलेजचे युवक-युवती यावेळी नांगरे-पाटील यांना भेटायला आले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर मोठ्या उत्साहात ही तरुणाई पोलिस अधीक्षकांच्या दालनातून बाहेर येताना पाहायला मिळाली. (प्रतिनिधी)