शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दुशेरे सोसायटीवर भरतदास पॅनेलचा झेंडा

By admin | Updated: March 30, 2016 00:03 IST

सर्वपक्षीय पॅनेलचा पराभव : धोंडिराम जाधवांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

कऱ्हाड : दुशेरे, ता. कऱ्हाड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात कऱ्हाड पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते व कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली भरतदास महाराज पॅनेलने नऊ जागा जिंकत विजयाचा झेंडा फडकाविला. विरोधी सर्वपक्षीय पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला.तालुक्याच्या राजकारणात दुशेरे गावला नेहमीच महत्त्व राहिले आहे. त्यामुळे येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. रविवार, दि. २७ रोजी सोसायटीसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमुळे यश नेमके कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या धोंडिराम जाधव यांच्या नेतृत्वाखालील भरतदास महाराज पॅनेलने बाजी मारल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. हा विजय खेचून आणण्यासाठी धोंडिराम जाधव यांना प्रकाश जाधव, उदय जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची मोलाची मदत झाली.भरतदास पॅनेलचे प्रताप जाधव, बाजीराव जाधव, राजाराम जाधव, हिंदुराव जाधव, सुभाष जाधव, सिंधुताई जाधव, कुसूम पाटील, आत्माराम मदने व नामदेव कोकणे तर विरोधी पॅनेलमधून अभिजित जाधव, पांडुरंग जाधव, उत्तम जाधव, भीमराव पवार हे उमेदवार विजयी झाले. या निकालामुळे धोंडिराम जाधव यांच्या नेतृत्वावरही पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.दरम्यान, निकालानंतर भरतदास पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, डॉ. अतुल भोसले, अ‍ॅड. उदय पाटील यांनीही नवनिर्वाचित संचालकांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)एक बिनविरोध भरतदास महाराज पॅनेलचे नामदेव कोकणे हे उमेदवार सुरुवातीलाच बिनविरोध म्हणून निवडून आले होते. त्यामुळे निवडणुकीत हेच पॅनेल बाजी मारणार, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. मात्र, तालुक्यातील बदलत्या राजकीय समिकरणामुळे दुशेरेतही धोंडिराम जाधव यांच्या विरोधात सर्वपक्षीय गट एकत्र येऊन रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीत रंगत भरली.