शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

लावला ‘भंडारा’... अन् फिरला वारा !--सातारनामा

By admin | Updated: October 17, 2014 22:52 IST

वाईत आवई : फलटण फिक्स; पण ‘माण-खटावात कोण रेऽऽ भाऊ?’

सातारा : ‘राम-लक्ष्मण’ जोडीनं कैक वर्षे जिल्ह्याचं राजकारण स्वत:च्या ताब्यात ठेवलं. ‘पाडापाडी’च्या राजकारणात मशहूर असलेल्या या जोडीला, यंदा मात्र आपलीच माणसं निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. म्हणूनच ‘फलटणचा निकाल स्पष्ट’; पण वाईमध्ये ‘हातातल्या घड्याळा’चं भवितव्य खंडाळ्यातल्या भंडाऱ्यावर अवलंबून. असाच प्रकार ‘माण-खटाव’मध्येही !दुष्काळी माण-खटावात ‘जयाभाव’ नं किती पाणी आणलं, माहीत नाही; पण इथं यंदा ‘पैशाचा पाऊस’ अन् ‘मतांचा महापूर’ दिसला. सुरुवातीला ‘गोरे’ की ‘पोळ’ अशी चर्चा होती, शेवटच्या टप्प्यात मात्र ‘कोणता भाऊ’ हाच सवाल विचारला गेला. ‘जयाभाव’नं आणलेल्या पाण्यापेक्षाही मुंडे-जानकरांची भावनिक साद ‘छोट्या भावा’साठी ‘लई भारीऽऽ’ ठरली. इथं ‘भंडारा’ गावोगावात चालला. सर्वात धक्कादायक म्हणजे, मायणीसारख्या गावातही मोठ्या आवडीनं ‘कपबशी’तून ‘मोदींचा चहा’ पिला गेला. ‘गुदगेंचं तात्याप्रेम’ (की जयाभाव द्वेष?) काही त्यांच्याच लोकांना पचनी पडलं नाही म्हणे. वडूज-दहीवडीत ‘जयाभाऊंचा हात’ दिसला असला तरी म्हसवडसह बाकीच्या वाड्या-वस्त्यांमध्ये म्हणे ‘कपबशी’चा खणखणाट. खटाव तालुक्यात ‘हरणाई’चा भोंगा चांगला वाजला. आता विषय इतकाच की, खटावचे ‘भैय्या’ किती मतं खातात, यावरच माणच्या दोन ‘भाऊं’ंचा निकाल अवलंबून. अजितदादा किंवा रामराजे मोगराळे घाट चढून वर आले असते तर कदाचित ‘घडाळ्याचे काटे’ अधिक गतीनं फिरले असते.फलटणमध्ये मात्र परिस्थिती एकदम वेगळी. लोकसभेपासून अत्यंत आक्रमक बनलेली ‘रणजित-दिगंबर’ जोडी ऐन विधानसभेला चिडीचूप का झाली, याचं उत्तर साऱ्यांसाठीच आकलनापलीकडं. कोणताही ‘शेतकरी’ परगावी जाताना पॅसेंजरचंच तिकीट काढतो; पण इथं या ‘स्वाभिमानी’ पठ्ठ्यानं म्हणे ‘अर्धा पेटी’चं ‘कन्फर्म तिकीट’ खरेदी केलं; अन् नंतर पुन्हा भरकटत गेलेली ‘बाबा एक्स्प्रेस’च पकडलेली. ‘तिकीट फेल’ गेल्याचं दु:ख जास्त की ‘गाडी’ चुकल्याचा पश्चाताप, हे आदरणीय दिगंबरावांनाच ठावूक. ट्रक भरून साड्या काय अन् टँकर भरून पाणी काय... सारंच मुसळ केरात गेल्याची रूखरूख लागलीय रावऽऽ.असो, लोकसभेत शिट्टी वाजल्यापासून शांत बसलेल्या रामराजेंचा खरा अवतार पुन्हा दिसून आला. ‘पोपट, चिमण्या अन् घुबडां’चा खेळ रंगविणारे ‘प्राध्यापक’ महाशयच पुन्हा एकदा फलटणचे ‘रिंगमास्टर’ ठरले... पण ‘पाटणमधल्या पोपटां’चं अन् कऱ्हाडातल्या ‘प्रिन्सिपल’बाबांचं काय? ‘दक्षिण’ खिंड लढविण्यासाठी किती हुशारीनं ‘उत्तरेचा बळी’ कसा दिला गेला? वाचायलाच हवं, पण उद्याच्या अंकात! (क्रमश:)वाईत मदनदादा पाच वर्षे आमदार नव्हते. कारखान्यातूनही बाहेर कधी पडत नव्हते. (असं ‘आबा’ म्हणतात, आम्ही नव्हे!) यंदा निवडणुकीला ते उभं राहणार की नाही, हे महिन्यापूर्वी ठरत नव्हतं. ठरलं तेव्हा पक्ष कोणता असेल, हे कार्यकर्त्यांना ठावूक नव्हतं. अगदी उमेदवारी फॉर्म भरेपर्यंत सारेच अंधारात होते. अशा वातावरणात मकरंद आबांचं फावलं. बावळेकरांचंही भागलं. अर्ज माघारीपूर्वीच गावोगावच्या पारावर म्हणे, ‘आबांच्या लीड’ पन्नास हजारांवर पोहोचला... पण, मदनदादा भलतेच वस्ताद निघाले. आबांना बेसावध ठेवून त्यांनी शेवटच्या क्षणाला ‘गनिमी कावा’ केला. आबांची एकेक माणसं फोडून ते त्यांच्याच पट्ट्यात घुसले. फुटलेला माणूस पुन्हा परत आणण्यातच आबांची शक्ती खर्ची झाली. झेड्पीमुळं आबांचा ‘लोणंद गटाचा आनंद’ हिरावला गेला. गावा-गावांतील गटातटांचाही फायदा दादांनी पुरेपूर उचलला. सुरुवातीला अत्यंत किरकोळीत काढल्या गेलेल्या घटकांचाही ‘इगो’ जागा झाला. (उद्या ‘बावधन’मधला आकडा फुटल्यानंतर या वाक्याचा अर्थ लक्षात येईलच!) थोडक्यात, शेवटच्या टप्प्यात मदनदादा अकस्मात आक्रमक झाल्यानं चकित झालेल्या मकरंद आबांना आपली बरीच समीकरणं बदलावी लागली. अशातच ‘महाबळेश्वरचा एक गठ्ठा’ बावळेकरांच्या खिशात पडला; तर ‘खंडाळ्यात भंडारा’ लावला गेल्यानं पुरुषोत्तमांचं ‘कमळ’ बऱ्याच गावात फिरलं. त्यामुळं कुणा एकाच्या नावाची ‘वाईत आवई’ उठवणं, याक्षणी तरी खूप अवघड.सचिन जवळकोटे