शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वीर जवान यांच्या स्मरणात भक्तीशक्ती दिंडी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:26 IST

दिंडीसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन

सातारा :  शूरवीर सैनिक देशासाठी लढले ज्यांना वीरमरण आले, अशा सातारा जिल्ह्यातील वीर जवान त्यांच्या स्मरणार्थ जावळी तालुक्यातील पवारवाडी येथील अंध वारकरी विजय महाराज पवार हे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी  सोहळ्याचे आयोजन करणार आहेत. ही पालखी शुक्रवार दि.६ रोजी निघणार असून सोमवार दि २३ रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे.

या पालखीत सहाशे वारकरी सहभागी होणार आहेत. जन्मापासून अंध असणारे विजय महाराज पवार हे गेली सत्तावीस वर्षे सलगदिंडी सोहळा आयोजित करत असतात. या सोहळ्याला समाजातील विविध स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. कोणी अन्नधान्य, कोणी अन्नदान ,तर कोणी आर्थिक मदत करत आहे. यंदा वीर जवान यांच्यासाठी सातारा जिल्हातून निघणारी पालखी देशातील पहिली पालखी सोहळा आहे. देशाच्या शूरवीर जवानांसाठी ही अनोखी निघत असणारी पालखी सोहळा हा अनेकांमध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण करतोतसेच अनेकांना प्रेरणाही या दिंडीतून मिळत आहे.

सातारा येथे विजय महाराज पवार आले असताना त्यांनी जिल्हा परिषदेसमोर बसणा-या शिक्षक कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी पाठिंबा जाहीर केला तसेच विठ्ठलाच्या चरणी तुम्हा सर्वांचा गा-हाने मी मांडणार आहे, असे सांगितले. तसेच शिक्षक कर्मचा-यांनीही या दिंडीला पाठिंबा दिला व चांगली मदत करू असे आश्वासन महाराजांना दिली.वीर जवानांबद्दल कृतज्ञतेसाठी जागृतीही दिंडी वीर जवान यांच्या स्मरणार्थ आयोजित केली असून त्याला नागरिकांनी  सढळ  हातांनी मदत करावी असे अंध विजय पवार यांनी  आव्हान केले आहे. सध्या जनजागृती व लोकसहभागाची सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेट देऊन हभप विजय महाराज वीर जवान यांच्याबद्दल माहिती देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.