शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शिंगणापुरात बहरलंय बेल रोपवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:02 IST

सचिन मंगरुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत ...

सचिन मंगरुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.मागीलवर्षी श्रावण महिन्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिखर शिंगणापूर येथे देवर्शनासाठी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या १७६.५७ हेक्टर राखीव वनक्षेत्राची पाहणी करत असताना त्यांनी या ठिकाणी बेल रोपवन तयार करण्याची कल्पना मांडली. तसे केल्यास शंभू महादेवाला अर्पण करण्यासाठी आवश्यक बेलपत्र भक्तांना सहज उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.त्यांच्या सूचनेनुसार माणच्या वन विभागाने राणंद येथील रोपवाटिकेत बेलाची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. रोपे तयार केल्यानंतर या रोपांची शिंगणापूर येथील वन विभागाच्या जागेत लागण करण्यात आली. साधारण एक हेक्टर क्षेत्रावर ६५० बेलाची रोपे लावली. बेल रोपवन तयार करण्यासाठी महाबळेश्वर, कास, ठोसेघरच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने एकूण दोन लाखांची आर्थिक मदत केली. फक्त लागवड करूनच वन विभाग थांबला नाही तर वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक नितीन जगदाळे व वनपाल महेंद्र पवार यांनी या रोपांची पूर्ण काळजी घेतली. वेळोवेळी किटकनाशके, औषधे फवारणी करून या रोपांचे संरक्षण करण्यात आले. याचा परिपाक म्हणून या रोपवनात लागवड केलेलीशंभर टक्के रोपे जिंवत असून त्यांची चांगली वाढ होत आहे. यामुळे परिसराची शोभा वाढण्यास मदत झाली आहे.वन पर्यटनहीवाढीस लागणार...शिखर शिंगणापूर येथील हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे वन विभागाच्या इतर क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात बेलांच्या रोपांची लागवड आवश्यक आहे. याचा मोठा फायदा होऊ शकतो. तसेच या तीर्थक्षेत्राला बेलांच्या रोपांनी सुशोभित करता येईल. शिंगणापूर येथे धार्मिक पर्यटनाबरोबरच वन पर्यटनही वाढीस लागेल. शिंगणापूर येथे साकारलेल्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्वजण वन विभागाला धन्यवाद देत आहेत. त्याचबरोबर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे. याठिकाणी दरराजे शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे बेलाच्या पानाला महत्त्व आहे. भाविक बेल घेऊनच मंदिरात दर्शनासाठी जात असतात. यातून विक्रेत्यांना फायदा होत असतो.