शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान.. इथं पावलोपावली जिवाची भीती!

By admin | Updated: April 19, 2017 23:03 IST

लोंबकळणाऱ्या तारांचे प्रमाण वाढले : कऱ्हाडातील रस्त्यावरील स्थिती; मालवाहू वाहनांना नेहमीच वाढता धोका

कऱ्हाड : शहरातील विविध भागांबरोबर मुख्य मार्गावर वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत तारा या सध्या खाली लोंबकळत असलेल्या पाहावयास मिळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मालवाहू ट्रक व गाड्यांना शॉक लागून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरणकडून याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. महावितरणच्या या कारभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कऱ्हाड शहरात महावितरणच्या वतीने रस्त्याच्या बाजूने घरगुती विद्युत तारांची लाईन नेण्यात आली आहेत. तर मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांची लाईन ही मुख्य रस्त्यांच्यामधून उंची वाढवून नेण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील दत्त चौक ते चावडी चौक मार्ग, बसस्थानक मार्ग ते कृष्णा नाका व भेदा चौक ते पोपटभाई चौक या मुख्य मार्गावर काही ठिकाणी अजूनही विद्युत तारा या खाली लोंबकळत असलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. शहरात घरगुती, खासगी कंपनी तसेच छोट्या उद्योगांना महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. शहरातील दत्त चौक ते चावडी चौक या मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी नेहमीच ट्रक तसेच चारचाकी वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी माल घेऊन येणाऱ्या वाहनांना सध्या या विद्युत तारा थटत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीजवाहक तारा रस्त्यावर खाली लोंबकळत असल्याने त्यापासून लहान मुलांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे. येथील लोंबकळणाऱ्या तारा हटविण्याबाबत तसेच तारांची उंची वाढविण्यासाठी अनेकवेळा वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे नागरिकांकडून मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. कऱ्हाड शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका, जनता बँकेसमोरील चौक, मंगळवार पेठ, कन्याशाळा, नवीन भाजी मंडई परिसर, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णामाई घाट परिसर, शुक्रवार पेठ या ठिकाणांवरील रस्त्याकडेला सध्या वीजवाहक तारा खाली लोंबकळत असून, त्यांची उंंची वाढविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शहरात काही ठिकाणी वीजवितरण कंपनीने भूअंतर्गत वीजवाहक तारांच्या जोडण्या केल्या आहेत. मात्र, रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांसाठी रस्ता उकरला असल्याने काही ठिकाणी तारा रस्त्यावरच आलेल्या आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे महावितरणकडून लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)