शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वंशाच्या दिव्याबरोबर बेटीही हसू लागली; मुलींचा जन्मदर वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही बाब आता मागे पडत चालली असून मुलीचे महत्त्वही अधोरेखित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही बाब आता मागे पडत चालली असून मुलीचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. त्यातच शासन पातळीवरूनही जनजागृती होत असून गर्भलिंग निदानावरील बंदीमुळे मुलींचा जन्मदर वाढत चालला आहे. सातारा जिल्ह्यातही हे सुखद चित्र दिसत आहे.

आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे मुलाला आपोआपच महत्त्व प्राप्त झाले आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा समजला जातो. त्यातच गर्भलिंग निदान करण्यात येत होते. यामुळे मुलींचा मृत्यू गर्भातच होत होता. पण, गेल्या काही वर्षांत शासनाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ सारखे अनेक उपक्रम राबविले. त्याचबरोबर मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली. याचा परिणाम सकारात्मक झाला. त्यातच गर्भलिंग निदानावर बंदी आली आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढत चालला आहे. सातारा जिल्ह्यात हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९४२ पर्यंत पोहोचले आहे. ही एक सुखद बाब आहे.

चौकट :

जिल्ह्यात हजार मुलांमागे मुली किती ?

२०१७ ९२७

२०१८ ९३४

२०१९ ९३०

२०२० ९४२

२०२१ ९०५

.................................

मुलामुलींची जन्मसंख्या

वर्ष मुले मुली

२०१७ २३२११ २१५२१

२०१८ २२३५४ २०८७४

२०१९ १८७५७ १७४५३

२०२० २२९९४ २१६६७

२०२१ ६२६९ ५६७२

...........................................

लिंगनिदानास बंदी...

राज्यात गर्भलिंग निदानास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंध या कायद्यानुसार गर्भलिंग निवड गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर गर्भाचे लिंग जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये, यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या कायद्याचा परिणाम चांगला झालेला आहे.

................................................