शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाड्या बंद.. कचरा घरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ३० टन कचरा हा घरातच पडून राहिला. जोपर्यंत वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा घंटागाडीचालकांनी दिला आहे.

सातारा पालिकेने चाळीस घंटागाड्या खरेदी केल्या असून, त्या एका खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. ४० पैकी ३० घंटागाड्यांचा ठेका पुणे येथील एका खासगी कंपनीने घेतलेला आहे. प्रत्येक घंटागाडीवर चालक व सहायक असे दोन कर्मचारी काम करतात. चालकाला प्रतिमहा आठ, तर सहायकाला सात हजार रुपये मानधन ठेकेदाराकडून दिले जाते. संचारबंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांची रोजीरोटी थांबली आहे. अशा परिस्थितीत ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे बिल अद्याप अदा केले नाही. वारंवार सांगूनही ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचा आरोप करत घंटागाडी संघटनेने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला.

साताऱ्यातील हुतात्मा स्मारक येथे सर्व घंटागाड्या लावण्यात आल्या. या आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत ढाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र कर्मचारी आपल्या मतावर ठाम होते. जोपर्यंत दोन महिन्यांचे मानधन मिळत नाही तोपर्यंत घंटागाडी सुरू करणार नसल्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला. या आंदोलनाचा फटका कचरा संकलनाला बसला. घंटागाडीचा न आल्याने सुमारे ३० टन कचरा हा सातारकरांच्या घरातच पडून राहिला.

(चौकट)

पालिकेने पैसे दिले ठेकेदाराने अडविले..

पालिकेकडून संबंधित ठेकेदाराला कर्मचार्‍यांच्या वेतनाची रक्कम वेळोवेळी अदा केली जाते. सद्यस्थितीला पालिकेकडे ठेकेदाराचे कोणतेच बिल थकीत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे बिल का रखडवले आहे, यामागे नक्की काय गौडबंगाल आहे, याची माहिती घेऊन मुख्याधिकार्‍यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

फोटो :

सातारा पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केल्याने सर्व घंटागाड्या हुतात्मा स्मारकात दिवसभर उभ्या होत्या. (छाया : जावेद खान)