शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

‘वाल्मीक’चं सौंदर्य आता एका ‘क्लिक’वर

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

वेबसाईट झाली अपडेट : हौशी युवकांचा पुढाकार, टेबल लँड जगाच्या नकाशावर

सणबूर : अनेक वर्षांपासून वल्मिकी हे निसर्गरम्य ठिकाण निसर्गप्रेमींपासून वंचित होते. हे ठिकाण जगाच्या नकाशावर आणण्याचे काम वेबसाईटद्वारे ढेबेवाडी येथील काही हौशी निसर्गप्रेमींनी केले आहे. निसर्गप्रेमींच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसराची ओळख करून देण्यासाठी युवकांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. सात वर्षांपूर्वी या युवकांनी ही वेबसाईट सुरू करून अनेक प्रेक्षणीय स्थळे निसर्गप्रेमींच्या समोर आणून दिली आहेत. वाल्मीकला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून या युवकांनी सतत धडपड केली आणि ठिकठिकाणी माहिती फलक लावले आहेत. ढेबेवाडीपासून अवघ्या २५ ते २७ किलोमीटर अंतरावर वल्मिकी ऋषींची तपोभूमी आहे. महर्षी वाल्मिकी ऋषींनी याच ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली असल्याचे सांगितले जाते. वाल्मिकी मंदिराच्या पाठीमागून शंभर मीटर अंतरावर वाल्मिकी नदीचा उगम झाला आहे. येथील मंदिराच्या बाजूला एका झऱ्यातून सतत पाणी वाहत असते. या झऱ्यातील पाण्याची क्षमता वाढत गेली आणि या झऱ्याचे रूपांतर वांग नदीत झाले, अशी अख्यायिका आहे. येथे विठ्ठलाईदेवी वाल्मिकी ऋषींचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरी मूर्ती आहेत. शिवाय या मंदिराच्या आतील गाभाराही संगमरवरी आहे. वाल्मिकी ऋषी येथे तपश्चर्या करत असताना त्यांच्या हातातील काठीला पालवी फुटली आणि त्या काठीचे झाडात रूपांतर झाले, अशी अख्यायिका येथे सांगितली जाते.प्रत्येकाच्या मनाला भुरळ पाडणारे निसर्गसौंदर्य आणि थंड हवामानामुळे प्रतिमहाबळेश्वर म्हणूनच प्रसिद्ध असलेले पाटण तालुक्यातील वाल्मीक हे निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि निसर्गप्रेमी येत असतात. वांग नदीचे उगमस्थान, उत्साही निसर्गसौंदर्य, थंड हवामान आणि समृद्ध जंगल या कारणांमुळे निसर्गप्रेमी या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. वाल्मीक पठारावरील गर्द झाडीत वाल्मिकी मंदिर असून, या ठिकाणी वांग नदीचा उगम झाला आहे. वाल्मीकपासून दोन किलोमीटर टेबललँड सुरू होतो. हा परिसर २५ किलोमीटर लांब आणि सात किलोमीटर रुंद आहे. नैऋत्येला संगमेश्वर (नायरी) व दक्षिणेस देखरुख (कुंडी) पर्यंतचा परिसर या टेबललँडने व्यापलेला आहे. (वार्ताहर)वाल्मीक पठाराचे ई-दर्शनपर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा कंधार धबधबा, इतिहासाचा साक्षीदार प्रचितीगड, सह्याद्रीच्या कुशीतील भैरवगड, निसर्गरम्य क्षेत्र वाल्मीक, मराठवाडी धरणाचे दृष्य, महिंद धरणाचा परिसर, श्रद्धास्थान असलेले नाईकबा मंदिर, सह्याद्रीच्या कुशीतील टेबललँड वेबसाईटवर पाहावयास मिळते.