शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणूक: उदयनराजेंची बळीराजाला साथ, शिवेंद्रसिंहराजेंना शह

By नितीन काळेल | Updated: April 20, 2023 20:09 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली भेट

सातारा : सातारा बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून दुरंगी लढत होत आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ देत एकप्रकारे सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना शह दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.

सातारा बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. एकूण १८ जागा आहेत. या संस्थेवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची ३० वर्षांपासून सत्ता आहे. या सत्तेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या या लढ्याला व पॅनेलला खासदार उदयनराजेंंनी साथ, पाठिंबा द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोसले, अर्जून साळुंखे यांच्यासह शिष्टमंडळ गेले होते. त्यावेळी उदयनराजेंबरोबर सविस्तर चर्चा झाली.

जगाचा पोशिंदा भरडला जातोय. त्यांच्या हक्कांना डावललं जातंय, शेतकरी संघटना या राजवटीच्याविरोधात लढत असून फक्त लढ म्हणा... अशी भावनिक साद स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना घातली. त्यानंतर उदयनराजेंनीही ताकदीने पॅनल उभे करा. हम करेसो कायदा म्हणणाऱ्यांना जागा दाखवा, असे स्पष्ट केले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच बळीराजाचे बळ आणखी वाढले आहे. तर खासदार उदयनराजेंच्या या भूमिकेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापुढे आव्हान उभे राहणार आहे. उदयनराजेंची ताकद बळीराजाला मिळणार असल्याने निवडणूकही रंगतदार होणार आहे.

सातारा या राजधानीत खऱ्याअर्थाने बळीराजाचं राज्य येण्यासाठी खासदार उदयनराजेंचा आशीर्वाद मिळाला आहे. यामुळे सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांत चैतन्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणजे कधी उसाच्या तर कधी टक्केवारीच्या विळख्यात अडकलेला शेतकरी खऱ्याअर्थाने बाजार समितीवर मालक म्हणून बसलेला दिसेल.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले