शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

माता-पित्यासाठी लेकीनं बांधलं स्वत:च्या हातानं स्वच्छतागृह

By admin | Updated: June 4, 2017 01:09 IST

लग्नाचा पाचवा वाढदिवस असाही सत्कर्मी : कवठेत तेजस्वीचं समाजाचे डोळे दिपवणारं कर्तृत्व; जन्मदात्यांसाठी अनोखी भेट

विनोद पोळ । लोकमत न्यूज नेटवर्ककवठे : गावकऱ्यांनी निर्मल ग्रामचा ध्यास घेतलेला. घरात स्वच्छतागृह बांधण्याचा आग्रह धरला जात होता. पण, वडिलांची परिस्थिती बेताचीच असल्याने ते असमर्थ होते. हे न पहावल्याने माहेरी आलेल्या तेजस्वीने आईवडीलांसाठी स्वच्छतागृह बांधून स्वत:च्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाची भेट दिली.कवठे येथील शिवाजी सूर्यवंशी यांची कन्या तेजस्वी हिचा विवाह पाच वर्षापूर्वी अतीत येथील विजय मोरे यांच्याशी झाला. विजय मोरे हे मुंबई येथे नोकरीस असल्याने स्वत:च्या मालकीच्या घरात मुंबई येथे तेजस्वीचा संसार सुरु झाला. वडील कवठे येथे रंगकाम करून कुटुंबाची गुजरान करीत असल्याने परिस्थिती तशी जेमतेमच. पदरी दोन मुली व एक मुलगा त्यातच मुलीच्या लग्नाचे कर्ज डोक्यावर असल्याने घराच्या बांधकामाची इच्छा असून पैशापुढे इलाज चालत नव्हता. उन्हाळा सुटीनिमित्त मुंबईहून माहेरी महिन्याभरासाठी तेजस्वी आली. कवठे गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने वडिलांना बोलावून घेऊन स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यास सांगितले. वडिलांनी दुष्काळी परिस्थितीने शेतीचे काहीच उत्पन्न नसल्याने व रंगकामात मंदी असल्याने शौचालय बांधण्यास असमर्थता दर्शविली. पावसाळाजवळ आल्याने ओढ्यालगत असलेल्या घरात पावसाचे पाणी दरवर्षीच शिरायचे. त्याचा त्रास, शौचालय नाही त्यामुळे कुटुंबाला होणारा त्रास तेजस्वीच्या समोर घडत असल्याने तेजस्वी विचार करू लागली आणि कोणतेही जुजबी प्रशिक्षण नसतानाही तिने स्वत:च बांधकाम करावयाचा निर्धार केला. ही कल्पना आई सुमन व भाऊ अक्षयच्या कानावर घालून शौचालय बांधणीसाठीचे साहित्याची जुळवाजुळव करण्यास कुटुंबात सांगितले. स्वत: पुढाकार घेऊन आपल्या लग्नाच्या वाढदिवशी शौचालय, तसेच घरास संरक्षक भिंत बांधून अनोखी भेट दिली.निर्मल ग्रामसाठी शासन विविध योजना आणत आहे. जनतेतून जनजागृती केली जाते. अनुदान दिले जाते. पण ग्रामस्थांमधून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, कवठे येथील तेजस्वी हिने दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसाचे निमित्त पुढे करुन आई-वडिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला. हा समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे गावकऱ्यांमधून कौतुक होत आहे. आता समाजानेही पुढे येण्याची गरज आहे.