शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘दक्षिण’साठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By admin | Updated: July 6, 2014 23:14 IST

जयवंत जगताप : सवादेत येथील बैठकीत आरोप

कऱ्हाड : ‘कऱ्हाड दक्षिणसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. कोणी पुढलं तर कुणी मागलं बांधलंय; पण आधी मुख्यमंत्री उभे राहताहेत का बघू. ते नाहीच म्हटले तर इतरांचं काय ते बघू; पण आता विधानसभेच्या तयारीला लागा,’ असे मत सातारा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते जयवंत जगताप यांनी व्यक्त केले. सवादे, ता. कऱ्हाड येथे औंड-उंडाळे परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.त्यावेळी ते बोलत होते. शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील, संचालक प्रकाश पाटील, नाना पाटील, वि. तु. सुकरे, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, अ‍ॅड. अशोकराव थोरात आदींची प्रमुख उपस्थित होती.सुनील पाटील म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ कोणा एकाची मक्तेदारी नाही. अन् कुणाला वाटत असेल तर मतदार ती मोडीत काढायला सज्ज झाले आहेत.’ प्रकाश पाटील म्हणाले, ‘लोकप्रतिनिधींनी खरंतर विकासकामासाठी प्रतिनिधीत्व करायचे असते; पण कऱ्हाड दक्षिणमधील विद्यमान लोकप्रतिनिधी चांगल्या कामाला विरोध करण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे यंदा लोक त्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवतील.’प्रा. ए. जी थोरात, अ‍ॅड. सरपंच शिवाजी थोरात यांचे स्वागत केले. संजय शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.उपसरपंच सचिन थोरात यांनी आभार मानले.कार्यक्रमास शिवाजीराव मोहिते, तानाजी चवरे, सचिन बागट, प्रवीण थोरात, धनाजी शेवाळे, रामचंद्र भावले, संजय शेटे, भास्कर शेवाळे, अर्जुन शेवाळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत थोरात, नितीन थोरात रंगराव सुतार, रघुनाथ पाटी, दिलीप कदम, प्रदीप थोरात आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)