शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद शहरात रंगला ‘बोरीचा बार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:40 IST

रात्र न् दिवस एक झाला : अधिवेशन सोडून आमदार निवडणुकीत तळ ठोकून

मुराद पटेल -- लोणंद -राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या लोणंद पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. कडक उन्हाने जिल्हा तापलेला असतानाच लोणंदमधील राजकीय वातावरणही ढवळून निघत आहे.लोणंद नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर पहिलीच पंचवार्षिक निवडणुकीला लोणंदकर सामोरे जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक युद्धाबरोबर भाजपाने तिसरा पर्याय निर्माण करत लोणंद नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. शिवसेनेने उमेदवार उभे केले असले तरीही त्यांची परिस्थिती अजूनही तळ्यात-मळ्यात असल्यासारखी झाली आहे. लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता काँग्रेसकडून १७ उमेदवार, राष्ट्रवादीकडून १४ तर पुरस्कृत २, भाजपकडून १७ उमेदवार, राष्ट्रवादीकडून १४ तर पुरस्कृत २, भाजपकडून १३, शिवसेनेने ९ उमेदवार, रासप २ उमेदवार व अपक्ष १९ असे ७६ उमेदवार आपले नशीब लोणंद नगरपंचायतीमध्ये आजमावत आहे. दरम्यान, उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. लोणंद नगरपंचायतीची लढत प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असून, भाजपाने जोरदार व आक्रमक व्यूहरचना आखत राजकीय वातावरण ढवळून काढल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. शिवसेना फक्त आरोप-प्रत्यारोपावर भर देत असून, शिवसेनेकडे व्यूहरचना आखण्यात नेतेमंडळी मशगूल दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे अधिवेशन सोडून दिवस-रात्र लोणंद-खंडाळ्यामध्ये ठाण मांडून बंडोबांना थंड करीत लोणंदमध्ये राष्ट्रवादीविरोधात असलेले वातावरण कशाप्रकारे निवळून सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती येईल, याची चाचपणी करत राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्याचा हातखंडा वापरत आहेत. दुसरीकडे शिवसेनेमध्ये आलेली मरगळ दूर करत शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी शिरवळ येथे शिवसेनेमधील आजी-माजी नेत्यांना एकत्र करत लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता जोरदार रणनीती आखली आहे. लोणंदकरांना जोरदार राजकीय धुळवड पाहण्यास मिळत आहे. एकूणच निवडणूक लोणंद नगरंपचायतीची रणनीती मात्र शिरवळ-खंडाळ्यात अशी स्थिती राजकीय पक्षांची झाली आहे. राजकीय रणनीती आखण्यात नेते मश्गुलकोणत्या प्रभागात कोणता उमेदवार प्रबळ ठरणार आहे. कोणत्या उमेदवाराची ताकद कमी पडत आहे किंवा विरोधक कोठे कमकुवत आहे. याचा विचार करुन रणनिती आखली जात आहे. सर्वच नेते मंडळी रात्रंदिवस एक करुन प्रचार करत आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना कामाला लावून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.