शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील भीषण अपघातात साताऱ्यातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 17:30 IST

बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा अपघातात मृत्यू : नागपूर येथे होणाºया स्विमिंग कॉम्पिटिशनला मुलीला घेऊन जात असताना अमरावतीजवळ पुलाच्या कठड्याला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जिल्हा बार असोएिसशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. 

ठळक मुद्दे मुलीच्या स्विमिंग कॉम्पिटिशनला जाताना अमरावती येथे भरधाव कार पुलाला धडकली कठड्याला कार धडकून झालेल्या भीषण ; दोन गंभीर आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे अन् बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा समावेश नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारातील घटना

सातारा / वर्धा : साताऱ्याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

 सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक विठ्ठल गाडे (४०) व आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे अथर्व मिलिंद शिंदे (११) दोन्ही रा. सातारा, अशी मृतकांची नावे आहेत. तर नितीन आनंद माने (४३) आणि माने यांचा मुलगा ओम दोन्ही रा. सातारा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

सुत्रानुसार, सातारा जिल्ह्यातील नितीन माने, दीपक गाडे, अथर्व मिलिंद शिंदे आणि माने यांचा मुलगा ओम असे चौघे जण एम.एच. ११/ बी.एच. ४३८३ क्रमांकांच्या कारने नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे आयोजित जलतरण स्पर्धेकरिता जात होते.

भरधाव कार नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारात आली असता ती ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यांवर आदळली. यात दीपक व अथर्वचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कारचालक नितीन माने आणि मुलगा ओम माने हे दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्तांपैकी दोघं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत.

  घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा (घा.) पोलीस ठाण्याचे निरज लोही व रंजन पाटील यांनी आपला चमुसह घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पंचनामा केला. या घटनेची कारंजा (घा.) पोलिसांनी नोंद घेतली आहे