शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

बाप्पाच्या निरोपाला जलधारा!

By admin | Updated: September 21, 2015 23:56 IST

गणपती बाप्पा मोरया : महाबळेश्वरात घुमला पारंपरिक वाद्यांचा आवाज

महाबळेश्वर : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ, पुढच्या वर्षी लवकर या,’ असा जयघोष, ढोल-ताशे अन् मृदंगाचा निनाद आणि सोबतीला आभाळातून बरसणाऱ्या जलधारा अशा भक्तिमय वातावरणात महाबळेश्वरात पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.महाबळेश्वरात सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरु होती. तरीही गणेश विसर्जनासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी पडला नाही. महाबळेश्वर व परिसरात भर पावसात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. वरुणराजाच्या साक्षीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेशाचे येथील सार्वजनिक हौदात विसर्जन करण्यात आले. सायंकाळी विविध गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका बाजारपेठतून मार्गस्थ होत होत्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोषाने संपूर्ण बाजारपेठ निनादून गेली होती. मिरवणुकीतील एकता मित्र मंडळाचे ढोल पथक व कोळी आळी गणेशोत्सव मंडळाने पारंपारिक वाद्यांचा गजरात काढलेल्या मिरवणुकीने नागरिकांसह पर्यटकांनाही आकर्षिक केले. विसर्जनासाठी महाबळेश्वर नगर पालिकेच्या वतीने हौद बांधण्यात आला होता. याठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. तसेच निर्माल्यासाठी विशेष कलश ठेवण्यात आला होता. मिरवणुकांचे स्वागत नगराध्यक्ष तोष्णीवाल व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील गणेश मंडळांना अत्यावश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्या दृष्टीने मंडळानी देखील सुरक्षेची काळजी घेतली. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)डॉल्बीला दणका महाबळेश्वरात दरवर्षी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत फक्त डॉल्बीचाच बोलबाला होता. मात्र, यंदा शहरासह तालुक्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला होता. यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत सर्वत्र पारंपारिक वाद्यांचाच गजर ऐकू येत होता.