लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यभर गुटखाबंदी असताना चौकाचौकांत चोरून लपून सर्रास गुटखा विक्री होत आहे. प्रशासन फक्त कागदावर कारवाई करत आहे म्हणून सातारा मनसेने अन्न व औषध कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलावरच गुटख्याच्या पुड्या ठेवल्या.
सातारा शहरात गुटखा कुठे मिळतो हे पुराव्यासहित मनसेने संबंधित अधिकाऱ्यांना दाखवले, अन्न व औषध कार्यालयाच्या बाहेरच्या टपरीवर जर गुटखा विक्री होत असेल, कार्यालयाच्या भिंती गुटख्याच्या पिचकारींनी रंगल्या असतील आणि अन्न व औषध प्रशासनाची गाडी बाहेर धूळखात उभी असेल तर यापेक्षा दुसरी कोणतीही शरमेची गोष्ट नाही, असे प्रतिपादन मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी केले. अन्न व औषध प्रशासनाला त्यांनी इशारा दिला की, २४ तासांच्या आत शहरातील गुटखाबंदी झाली नाही तर सगळं गुटखा तुमच्या तोंडात भरल्याशिवाय राहणार नाही. यावेळी निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला संबंधित प्रशासन जबाबदार असेल, असेही पवार यांनी नमूद केले.
या वेळी सातारा मनसे शहर अध्यक्ष राहुल पवार, शहर उपाध्यक्ष मुश्ताक बोहरी, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, गणेश पवार, अविनाश भोसले, अझहर शेख, राज पुजारी व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
फोटोसह घेणे