चक्रिवादळासह पावसाचे थैमान
शेकडो झाडांसह विद्यूद खांब उन्मळून पडल्याने मोठी हाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर :
चचेगांवसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान घातले. हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे वीस लाखांवर नुकसान झाले आहे. तर शिवारात ठिकठिकाणी शेकडो झाडांच्या फांद्यांसह मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तर जुने गावठाण परिसरात सलग सहा विद्युत खांब जमीनदोस्त झाल्यामुळे मोठी हानी झाली आहे.
रविवारी सकाळपासूनच जोरदार चक्रीवादळासह संततधार पावसाने हजेरी लावली. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चचेगावातील केळीच्या बागांना चांगलाच फटका बसला आहे. येथील विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार, हनुमंत दाजी हुलवान यांची सात एकरमध्ये केळीची बाग आहे. पंधरा ते वीस दिवसांत ती केळी विक्रीयोग्य होणार होती. मात्र, वादळी वाऱ्याने व पावसाने या केळीच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेली केळीच्या बागेतील केळीची झाडे वादळी वाऱ्याने मोडून पडली आहेत. या सात एकर बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे किमान २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वाऱ्याने बागेची झालेली अवस्था बघून चचेगावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. चचेगांवसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. या पिकांचे मांडव पडल्यामुळे नुकसान झाले आहे. दोन दिवस आलेल्या चक्रीवादळाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चचेगावातील शेतकरी करीत आहेत.
चौकट (फोटो आहे )
शेकडो झाडे भुईसपाट
सोसायट्याच्या वाऱ्याने चचेगांव शिवारात झाडांच्या फांद्यांसह मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. ही झाडे शेतातील पिकात पडल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तर चचेगांव स्मशानभूमीलगतची झाडे पडल्याने कुंपणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चौकट (फोटो आहे)
जुने गावठाण तीन दिवसांपासून अंधारात
रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे जुन्या गावठाणालगत सलग सहा विद्युतखांब जमीनदोस्त झाल्यामुळे हा परिसर तीन दिवसांपासून अंधारात आहे.
चौकट (फोटो आहे)
शेकडो एकर शेतात पाणीच पाणी.. मशागत लांबणीवर
दोन दिवस पडलेल्या पावसामुळे चचेगांव शिवारातील शेकडो एकर शेतीत पाणीचपाणी साचले आहे. पीक असलेल्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर मोकळ्या शेतातून पाणी साचल्याने खरीप हगामाच्या पेरणीच्या तयारीसाठी मशागतीची कामे लांबणीवर पडणार आहेत.
फोटो कॅप्शन
चचेगांवसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान घातले. हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. (छाया- माणिक डोंगरे)
===Photopath===
180521\img-20210518-wa0060.jpg
===Caption===
चचेगांवसह परिसरात चक्रिवादळासह पावसाने चांगलेच थैमान घातले. हातातोंडासी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. (छाया- माणिक डोंगरे)