शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

शिल्लक निधी वळवण्याचा घाट

By admin | Updated: June 20, 2014 23:06 IST

मेगा पाणलोट प्रकल्प : पाटण तालुक्यात समित्या अंधारात

पाटण : कृषी विभागाच्या ‘मेगा पाणलोट’ प्रकल्पातील प्रेरक प्रवेश उपक्रमाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर असतानाच आता पाणलोट समित्यांना अंधारात ठेवून शिल्लक निधी परस्पर इतर ठिकाणी वळवण्याचा ‘घाट’ अधिकाऱ्यांनी घोतला आहे. त्यामुळे ‘तेल ही गेले आणि तुपही गेल’े असे म्हणण्याची वेळ पाटणलोट समित्यांवर आली आहे. ‘मेगा पाटणलोट’ प्रकल्पातील ‘प्रेरक प्रवेश’ उपक्रमातील साहित्य खेरदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाणलोट समित्यांच्या आधारे केला आहे. मात्र उपक्रमातील साहित्य खरेदी करुन उर्वरीत रक्कम पाणलोट समिती व ग्रामसभा ठरावानुसार खर्च करण्यात यावी, अशी मागणी केली असताना शिल्लक रक्कम नैसर्गिक साधन संपत्तीवर खर्च करण्याचा प्रयत्न कृषी अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे. त्यामुळे पाणलोट समितींच्या अधिकारावरच यामुळे गंडांतर येणार असल्याचे बोललं जात आहे. तालुक्यातील चौवीस गावांचा समावेश प्रकल्पामध्ये करण्यात आला होता. प्रकल्पाच्या चार टक्के रक्कम या उपक्रमावर खर्च करण्यात आली होती. त्यानुसार ५५ लाख ६७ हजार एवढा निधी या गावांना मिळाला होता. निधी खर्च करण्याचे अधिकार पाणलोट समित्यांना देण्यात आले होते. मात्र समित्यांना अंधारात ठेवून चौवीस गावातील सुमारे ४३ लाख ४९ हजार निधी परस्पर खर्च केला आहे. मागणी नसताना उपक्रमातील साहित्य समित्यांच्या माथी मारले आहे. शासनाचे मार्गदर्शक तत्वे गुंडाळून समित्यांना माहिती न देता निधीची विल्हेवाट लावली आहे. शिल्लक निधी सुमारे १२ लाख १८ हजार एवढा असून शिल्लक निधी तरी ग्रामसभांच्या मागणीनुसार खर्च करण्यात यावा. मात्र, कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी हा निधी नैसर्गिक साधन संपत्तीवर खर्च करण्याचे म्हटले आहे. निधी खर्च करण्याचे अधिकार ग्रामसभांना असतात इतर ठिकाणी निधी वळविण्याचा अधिकार संबंधितांना दिला कोणी हे समजत नाही. (वार्ताहर)