शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पारगावचे ढमाळ बनले ‘बजरंगी भाईजान’

By admin | Updated: September 17, 2015 00:44 IST

हरियाणातील भाऊ बेपत्ता : असंख्य ठिकाणी फोनाफोनी केल्यानंतर भेटले नातेवाईक

मुराद पटेल / शिरवळ स्मृतिभंश होऊन, नातेवाइकांपासून तब्बल साडेतीन वर्षे लांब राहिल्यानंतर एक देवदूत बनलेल्या अवलियामुळे हरियाणाच्या दोन सख्ख्या भावांची भेट झाली. ही अविस्मरणीय भेट घडवून आणली पारगावचे सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ यांनी. हरियाणा राज्यातील औरंगाबाद (ता. जगाधरी जि. यमुनानगर) येथील चालक असलेला सोहम चरन सिंह ( वय ४५) हा स्मृतिभंश होऊन सुमारे साडेतीन वर्षांपासून घर सोडून फिरत फिरत खंबाटकी घाटात असणाऱ्या युवराज ढमाळ यांच्या हॉटेलसमोर येऊन उभा राहिला. यावेळी ढमाळ यांनी त्याला चहा-नाष्टा देऊन आस्थेने चौकशी केली असता त्याला फक्त स्वत:चे आणि वडिलांचे नाव व गावचे नाव सांगता येत होते. यावेळी युवराज ढमाळ यांनी मोबाइल इंटरनेटवर शोध घेत सोहमच्या शोध घेतला असता ते हरियाणा राज्यातील असल्याचे समोर आले. यानंतर एक तासाच्या अथक परिश्रमानंतर हरियाणा राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये खात्री करून कोणत्याही शासकीय मदतीविना एका हवालदाराकडून सोहमने सांगितलेल्या गावातील माजी सरपंचांचा मोबाइल नंबर मिळवून संपर्क साधला. सोहम यांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला असता, तो त्या गावातीलच असून साडेतीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समजले. मग सोहमला विश्वासात घेत युवराज यांनी आपल्या घरी आणले. त्याला नवीन कपडे देऊन स्वत:च्या घरातील कुटुंबातील एक सदस्य समजून सोहम सिंहची देखभाल केली. कारण सोहमच्या नातेवाइकांच्याकडे महाराष्ट्रात येण्यासाठी पैशांची कमतरता होती . यावेळी युवराज ढमाळ यांनी ‘तुम्ही येईपर्यंत मी त्यांचा सांंभाळ करतो,’ असे सांगितल्याने नातेवाईक निश्चिंत झाले. दरम्यान, सोहम सिंहचा सख्खा भाऊ जय सिंह व चुलतभाऊ रिंकू सिंह आल्यानंतर खात्री करीत सख्ख्या भावाच्या ताब्यात ढमाळ यांनी सोहमला दिले. यावेळी तब्बल साडेतीन वर्षांनंतर भावाची भेट झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत होता.