शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनगरवाडी कुटुंबांचा संसार घोड्यांच्या पाठीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:24 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दुष्काळ म्हणजे काय आणि त्यानं काय होतं हे पाहायचे असेल तर ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दुष्काळ म्हणजे काय आणि त्यानं काय होतं हे पाहायचे असेल तर माणदेशात गेलंच पाहिजे. कारण, माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत. बनगरवाडीतील मेंढपाळांची तर आठ कुटुंबे दिवाळीपासून घोड्यावर संसार बांधून मराठवाड्यात आहेत. मेंढ्या जगविण्यासाठी रोज त्यांना नवे गाव शोधावे लागत आहे.माण तालुक्यात बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेती. त्याचबरोबर या शेतीवर अवलंबून असणारा दुग्ध, शेळी-मेंढीपालन व्यवसाय. या तालुक्यातील आजही अनेक गावांत मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. या व्यवसायावरच त्यांचा वर्षानुवर्षे उदरनिर्वाह चालतो. दरवर्षी जून महिन्यानंतर पाऊस झाला की सगळीकडे आबादी आबाद असते; पण एखाद्या वर्षी पावसाने डोळे वटारले की जनावरे जगविण्यासाठी गावच काय घरदार सोडायची वेळ येते. अशाचप्रकारे आताच्या दुष्काळात माण तालुक्यातील अनेक शेतकरी, मेंढपाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या जगविण्यासाठी तालुकाच नव्हे तर जिल्हा सोडून गेले आहेत.माणमधील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) हे गाव. जेमतेम दोन हजार लोकसंख्या गावाची. या गावातील तरुणवर्ग पुण्या-मुंबईला नोकरीला. तर अनेकांचा मेंढीपालनाचा व्यवसाय. याच गावातील आठ कुटुंबे दुष्काळ पडल्याने गेल्यावर्षी दिवाळी झाल्यानंतर मेंढ्या जगविण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडली आहेत. पंढरपूर, बार्शी अशी गावे करत आज ही कुटुंबे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहेत. या बनगरवाडीतील अशोक बनगर, किसन बनगर, सदाशिव वाघमोडे, चंद्रकांत ढेरे, धर्मा दोलताडे, नेताजी बनगर, गणेश शिंगाडे आणि दत्तू काळे हे मेंढ्या जगविण्यासाठी बाहेर पडलेत. तसेच यांच्या घरातील माणसे मिळून १५ जण ५०० मेंढ्यासाठी झटत आहेत. कोणी मेंढ्यामागे जाते तर कोणी थांबलेल्या ठिकाणी स्वयंपाक करते. कोणी विहिरीतून पाणी काढून मेंढ्यांची तहान भागवते. तर कोणी चारा कोठे मिळतोय का ? याचा शोध घेतो. त्यामुळे सर्वांनाच दररोज नव्या गावात मुक्काम करावा लागतो. मग, तो जागा घाणीचा असो किंवा काट्याकुट्याचा; पण जगायचं आणि जगवायचं हेच ठरवून घरातून बाहेर पडलेल्या या कुटुंबांना आता पाऊस पडेपर्यंत मराठवाड्यातच राहावं लागणार आहे.मोबाईल चार्जिंग करायला एकजण...मेंढपाळ कुटुंबीय मराठवाड्यात असलीतरी गावी मुलं, आई-वडील, नातेवाईक आहेत. त्यांच्याशी दरररोज नसलातरी दोन-चार दिवसांतून संपर्क करावा लागतो. त्यासाठी काहीजणांकडे मोबाईल आहे. हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी शेजारील गावात जावे लागते. सर्वांचेच मोबाईल एकाने न्यायचे व ते चार्ज करून आणायचे. तोपर्यंत इतरांना मेंढ्यांना पाणी पाजणे, वाघर लावणे, दळण, जळण गोळा मरणे अशी कामे करावी लागतात. तर या कुटुंबाबरोबर ५०० मेंढ्या, ८ घोडी आणि ६ कुत्री आहेत. घोड्यावर कुटुंबाचा सारा संसार असतो.