शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गिरवीकरांचा ‘हात’ आगवणेंच्या पाठीवर

By admin | Updated: October 23, 2014 22:48 IST

फलटणचे राजकारण : काकडेंपेक्षा मिळाली जादा मते

वाठार निंबाळकर : विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गिरवी गटात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांची केलेली पाठराखण, तर माजी आमदार चिमणराव कदम यांच्या गिरवी गावात त्यांनी उभे केलेले पोपटराव काकडे तीन क्रमांकावर, असे चित्र पाहायला मिळत आहे.माजी आमदार चिमणराव कदम यांच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या पोपटराव काकडे यांना मत द्यायचे की काँग्रेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांना द्यायचे. मात्र, झालेल्या मतदानामध्ये राष्ट्रवादी ५६२ मते, काँग्रेसला २,२७५ तर स्वाभिमानीचे पोपटराव काकडे यांना १७७ मते पडली. धुमाळवाडीत राष्ट्रवादीला १२२ मते, काँगे्रसला ५४३ मते, स्वाभिमानीला २४ मते पडली.बोडकेवाडीत राष्ट्रवादीला १२८ मते, काँग्रेसला २४५ मते पडली, दरेवाडीत राष्ट्रवादीला १७० मते, काँग्रेसला १६० मते, उपळवेत राष्ट्रवादीला २१९ मते, काँग्रेसला २४१ मते उपळवेत दुसऱ्या बुथवर राष्ट्रवादीला २५५, तर काँग्रेसला २९२ मते पडली.वेळोशीत राष्ट्रवादीला ३११ मते, काँग्रेसला १३० मते, तरडफगावात राष्ट्रवादीला ६८९ मते तर काँग्रेसला १५८ मते पडली. मानेवाडीत राष्ट्रवादीला ११५ मते, काँग्रेसला १२१ मते पडली. ताथवडा गावात राष्ट्रवादीला ४७३ मते, तर काँगे्रसला १५१ मते, तर शिवसेनेला ४५ मते पडली. झडकबाईचीवाडी गावात राष्ट्रवादीला १२९ मते, काँग्रेसला ११२ मते पडली. मिरेवाडीत राष्ट्रवादीला २४६ मते, तर काँग्रेसला १५६ मते पडली.विंचुर्णी गावात राष्ट्रवादीला २०१ मते, तर काँग्रेसला २३६ मते पडली. निरगुडीत राष्ट्रवादीला ६३७ मते, तर काँग्रेसला १०२८ मते पडली. मांडवखडकमध्ये राष्ट्रवादीला २०७ मते, काँग्रेसला ४०५ मते तर राष्ट्रवादीला २८४ मते पडली.ढवळगावात राष्ट्रवादीला ६१७ मते, काँग्रेसला ६७० मते तर स्वाभिमानीला १९० मते पडली. पिराचीवाडी गावात राष्ट्रवादीला १५० मते, काँग्रेसला ७९ मते, शिवसेनेला २४ मते पडली. एकूण गिरवी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांना १०,३३० मते तर काँग्रेसचे दिगंबर आगवणे यांना १०,२१६ स्वाभिमानीचे पोपटराव काकडे यांना १,४१५ मते पडली. (वार्ताहर)गटाची सत्ता काँगे्रसला फायद्याचीगिरवी जिल्हा परिषद गटाचे सदस्यत्व काँग्रेसकडे असून, एक पंचायत समिती गण काँग्रेसकडे तर एक गण राष्ट्रवादीकडे आहे. या गटात काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली. गिरवी, ता. फलटण हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे निवडणुकीत गावामध्ये तणावाचे वातावरण होते. तरीही या गावातून दिगंबर आगवणे यांना आघाडी मिळाली.