शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाबाराजे म्हणाले, ‘हे किती दिवसांचे पाहुणे’

By admin | Updated: October 6, 2014 22:43 IST

जाहीरनामा प्रसिध्द : सातारा-जावळीतील भाजपच्या उमेदवारावर केली सडकून टीका

सातारा : ‘माझ्याविरोधात उभे राहिलेले भाजपचे उमेदवार एका घरात कधी जास्त काळ राहिले नाहीत. त्यांनी आधीच काँगे्रस, शिवसेना असा प्रवास केला आहे. आता ते किती दिवस भाजपचे पाहुणे असणार आहेत, हे भाजप निष्ठावंतांनी माहिती करून घेऊनच त्यांचा प्रचार करावा,’ अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. सुरूची या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्ता बनकर, नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, रवींद्र झुटिंग, भालचंद्र निकम, प्रवीण पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित त्यांनी यावेळी आपल्या जाहीरनाम्याचे प्रकाशनही केले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘निवडणूक आली की, जनतेसमोर आलेल्या विरोधी उमेदवारांनी सातारा-जावळीसाठी काय योगदान दिले आहे? काही उमेदवारांच्या घरात वडिलांपासून सत्ता होती. मात्र, जनतेनेच त्यांना एकदाचे घरी बसविले. मागे कुडाळ गटात आमच्यामध्ये पडलेल्या दुफळीचा त्यांनी फायदा घेतला. एकदा शिवसेना, एकदा भाजप असं ते आणखी किती घरांचा प्रवास करणार आहेत. ते भाजपमध्येही जास्त काळ टिकून राहतील, याबाबत शाश्वती नाही.निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली नाही, अशी आवई उठवून ते पक्षाबाहेर पडतील. त्यामुळे ते किती दिवसांचे पाहुणे आहेत, याचा विचार करून निष्ठावंतांनी त्यांचा प्रचार करावा, हवं तर त्यांच्याकडून तसं लिहून घ्यावं. असे हंगामी नेतृत्व कामाचे नसते, हे आधी भाजप निष्ठावंतांनीही जाणून घ्यावं.’‘विरोधक एकाच घरात चाळीस वर्षे सत्ता असल्याचा आरोप करतात, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी लोक प्रेमापोटी आमच्या पाठीशी आहेत. मतदार स्वत: बटन दाबतात, मी नाही, आम्ही नेहमीच समाजात एकी ठेवण्याचा प्रयत्न केला, याचीच ती पोहचपावती आहे.’ दीपक पवारांनी नगरपालिकेला पॅनेल उभे करण्याचा इशारा दिला आहे, याबाबत छेडले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘नगरपालिकेलाच काय साखर कारखाना, जिल्हा बँकेचीही निवडणूक त्यांनी लढवावी. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल.’दरम्यान, त्यांच्या जाहिरनाम्यात कास तलाव उंची, शहरातील रस्त्यांसाठी आणलेला निधी, सातारा व जावळी तालुक्यांतील विविध विकासकामे, तीर्थक्षेत्र विकास आदी योजनांचा उल्लेख केला आहे. (प्रतिनिधी)आता तरी पक्षाने विचार करावाअनेक वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केले आहे. आता तरी मंत्रिपदासाठी पक्षाने विचार करणे गरजेचे आहे, अशी सुप्त इच्छा शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.