शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आयुर्वेदिक गार्डन उभारणार

By admin | Updated: March 12, 2015 00:02 IST

उदयनराजे : दीड कोटीच्या निधीची तरतूद

सातारा : ‘सातारा शहरात दोन एकर परिसरात अत्याधुनिक पद्धतीने आयुर्वेदिक गार्डन साकारण्यात येणार असून, विविध प्रकारचे वॉकिंग ट्रॅक पथ, वनौषधींची लागवड, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांकरिता सुसज्य अभ्यासिका उभारण्यात येणार असून यासाठी १३ व्या वित्तआयोगामधून केंद्राच्या माध्यमातून दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे,’ अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. ज्येष्ठांसाठी ग्रंथालय, याबरोबरच मन:शांतीसाठी शास्त्रीय दृष्टिकोनामधून उभारण्यात येणारे पिरॅमिडस आदी वैशिष्ट्यांचा समावेश या आयुर्वेदिक गार्डनमध्ये आहे. बाग-बगीच्याच्या सुविधांमुळे मन प्रफुल्लित होण्याबरोबरच विरंगुळा मिळण्याचे ठिकाण नागरिकांना उपलब्ध व्हावे आणि शास्त्रीय दृष्टिकोनामधून बागबगीचा निर्माण व्हावा. या हेतूने सातारा शहरात नगरपरिषदेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यामंदिरासमोरील सुमारे दोन एकर जागेत आयुर्वेदिक उद्याननिर्मितीबाबत पालिकेला सुचवून केंद्राकडे जरूर तो पाठपुरावा केला होता. या आयुर्वेदिक गार्डनमध्ये वॉकिंग ट्रॅकमध्ये, आरोमा पाथ, मड पाथ, सॅन्ड पाथ, कोल्ड व हॉट वॉटर पाथ अशा वेगवेगळ्या उपयुक्त ट्रॅकची करण्यात येणारी उभारणी वेगवेगळ्या स्वरूपाची आयुर्वेदिक ट्रिटमेंट विविध आजारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच मेडिटेशनसाठी खास पद्धतीचे अत्याधुनिक पिरॅमिडस उभारण्यात येणार आहेत. तसेच लेसर शो, संगीत कारंजे आदींचा या गार्डनमध्ये समावेश आहे.तरुणांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या अभ्यासाठी दर्जेदार अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी पुस्तकांचा खजाना असलेले सुसज्य ग्रंथालय, लहान मुलांसाठी खेळण्याकरिता लॉन, तसेच आधुनिक खेळणी, आयुर्वेदिक वनौषधींची आणि वृक्षांची सूक्ष्म नियोजनानुसार लागवड केली जाणार आहे.या गार्डनची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (प्रतिनिधी)शहराच्या लौकिकात भरसाताऱ्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचे सुसज्ज असे आयुर्वेदिक गार्डन उभारले जाणार आहे. हा प्रकल्प बहुदा महाराष्ट्रातील पहिला असू शकतो. आत्तापर्यंत अशाप्रकारे सुखसोयीने साताऱ्यात एकही ठिकाण नाही. या गार्डनमुळे साताऱ्याच्या लौकिकात भर पडणार आहे. विशेषत: ज्येष्ठांना आणि लहान मुलांना सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी व खेळण्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या पाडव्याच्या दिवशी कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. असेही खासदार उदयनराजे यांनी सांगितले.