शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्यसनमुक्तीसाठी सोशल मीडियावर चित्रमय जागर खंडाळ्यातील युवकाकडून प्रबोधन : अनोख्या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक; ‘सेल्फी’बाबतही जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:09 IST

‘का जडला हा रोग मजला, का जडली ही विदीर्ण व्याधी, दिसले माझे मरणच मजला, जीवन जगण्या आधी,’ आयुष्यातील विविध व्याधींचे मूळ हे व्यसन आहे. हीच व्याधी आपणास मरणाच्या दारात खेचून नेत असते. वास्तविक याची जाणीव सर्वांनाच असते. मात्र,

खंडाळा : ‘का जडला हा रोग मजला, का जडली ही विदीर्ण व्याधी, दिसले माझे मरणच मजला, जीवन जगण्या आधी,’ आयुष्यातील विविध व्याधींचे मूळ हे व्यसन आहे. हीच व्याधी आपणास मरणाच्या दारात खेचून नेत असते. वास्तविक याची जाणीव सर्वांनाच असते. मात्र, व्यसनापासून दूर व्हायला मन सहजासहजी धजावत नाही; पण लोकांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी खंडाळ्यातील युवकाने चित्रांद्वारे सोशल मीडियावर प्रबोधन सुरू केले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

माणसांनी व्यसनमुक्त व्हावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना काम करीत असतात. परंतु सर्वांचेच प्रयत्न फळाला येतात असे नाही. खंडाळ्यातील प्राणीमित्र रवींद्र पवार याने संगणकावरील चित्रमय कौशल्यातून व्यसनमुक्तीचे पाठ लोकांपुढे मांडले आहेत. यामध्ये सिगारेट ओढणे, धूम्रपान करणे यामुळे शरीरावर होणारे विपरत परिणाम, दारू पिऊन घरावर येणारे संकट तसेच गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे ते अलीकडच्या काळात सेल्फी काढताना डोंगर कड्याावर उभे राहिल्याने घडणारे अनर्थ अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे.

विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लाखो माणसांपर्यंत पोहोचले जात आहे. या चित्रांमधून तरुणांमध्ये प्रबोधन घडत आहे. तरुण वर्ग व्यसनांपासून दूर राहण्यासाठी याचा मोठा प्रभाव पडत आहे. वास्तविक रवींद्र पवार याने प्राणीमित्र म्हणून वाईल्ड लाईफ संघटनेच्या माध्यमातून अनेक प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. मात्र, व्यसनाच्या आहारी चाललेल्या युवा पिढीला यापासून परावृत्त करण्यासाठी काहीतरी करायले हवे, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तो प्रत्यक्षात साकारलाही. चित्रांच्या माध्यमातून त्याने व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन सुरू केल आहे. 

जग आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असले तरी तरुण वर्ग व्यसनांकडे झुकत आहे. व्यसनामुळे युवा पिढी भरकटू लागली आहे. त्यांना व्यसनांपासून प्रवृत्त करणे गरजेचे आहे. या जाणिवेतून ही संकल्पना सूचली. अशा विविध चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचा विचार आहे. यातून लोकांमध्ये चांगला संदेश पोहोचेल.- रवी पवार, प्राणीमित्र खंडाळा