शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश मोहितेंचा जामीन फेटाळला

By admin | Updated: March 17, 2017 23:22 IST

बोगस कर्ज प्रकरणी एक महिन्यापासून अटकेत

कऱ्हाड : बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून गेल्या एक महिन्यापासून अटकेत असणारे कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचा जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात तोडणी वाहतूकदारांची केवायसी कागदपत्रे वापरून व खोट्या सह्या करून सुमारे ५८ कोटी ६३ लाख ९ हजार ३७१ रुपयांचे बोगस कर्जप्रकरण केल्याचा आरोप आहे. त्याबाबतची तक्रार ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी कऱ्हाड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्याने माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना १३ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर बचाव पक्षाकडून जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर करण्यात आला. यावर सुनावणी होऊन दोघांनाही जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर बचाव पक्षाने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी त्यावर सरकार पक्षाने युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)जामीन मंजूर झाला तर दबाव : सरकारी वकील‘कारखान्याच्या कर्जाशी वाहतूक कंत्राटदारांचा संबंध नाही. मात्र, कागदपत्राचा वापर करून बोगस प्रकरणे करून कर्ज रक्कम कंत्राटदारांच्या खात्यावर जमा न करता संघाच्या नावावर जमा करण्यात आली. बँकेने कर्जफेडीसाठी शेतकऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. जामीन मंजूर झाला तर अविनाश मोहिते व सुरेश पाटील यांच्यासह इतरजण वाहतूक कंत्राटदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन नामंजूर करावा,’ अशी मागणी सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने अविनाश मोहिते व सुरेश पाटील यांचा जामीन फेटाळला.