शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘कुमुदा’च्या अविनाश भोसलेला अटक !

By admin | Updated: April 7, 2017 00:13 IST

बनावट कागदपत्रे; ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे कोट्यवधी रुपये थकीतप्रकरणी चर्चेत असणाऱ्या बेळगाव येथील कुमुदा शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्टस लि.,चा अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश भोसले याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. रयत सहकारी साखर कारखान्याशी केलेल्या करारपत्रात जाणूनबुजून फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी कऱ्हाड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता दि. ९ एप्रिलपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेवाळेवाडी-म्हासोली येथील रयत सहकारी साखर कारखाना व बेळगाव येथील कुमुदा शुगर्स यांच्यामध्ये १९ सप्टेंबर २०१३ मध्ये साखर आयुक्तांच्या समोर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याबाबतचा करार झाला होता. या कराराची नोंदणी कऱ्हाड सबरजिस्टर यांच्याकडे करणे बंधनकारक होते. असे असताना करारपत्रातील पाने बदलून बनावट कागदपत्रे बनवून दि. ५ आॅक्टोबर २०१३ मध्ये सबरजिस्टर बेळगाव (कर्नाटक) यांच्याकडे याची नोंदणी केली. अशा बनावट नोंदणीचा आधार घेऊन अविनाश भोसले याने महाराष्ट्र शासनाची स्टॅम्प ड्यूटी बुडवली आहे. याप्रकरणी कारखान्याच्या वतीने २७ आॅगस्ट २०१५ रोजी कऱ्हाड न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्यात १५६/क प्रमाणे चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते. बार्शी पोलिसांनी थकीत ऊसबिलप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी अविनाश भोसले याला अटक केली होती. कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी बार्शी न्यायालयाकडून त्याला ताब्यात घेऊन कऱ्हाड न्यायालयात हजर केले असता त्याला दि. ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबर कऱ्हाड ग्रामीण पोलिसांकडे शेतकरी व वाहतूकदारांच्या आर्थिक फसवणुकीचे अनेक तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. त्याच्या चौकशीसाठीही अविनाश भोसले पोलिसांना हवा होता. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकरी व वाहतूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन कऱ्हाड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)