शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

मतदान जनजागृतीसाठी अवलियाचा दुचाकी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:50 IST

सातारा : मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे ...

सातारा : मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत.साताऱ्यातील प्रमुख चौकांमध्ये मंगळवारी शिट्टीचा आवाज येत होता. पोलीस अधीक्षकांच्या परिपत्रकामुळे वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर दिसणे दुर्मीळ झाले असताना शिट्ट्या कोण मारतंय, हे पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना एक सहा फुटांचा धिप्पाड देह नजरेस पडला. अंगात पांढरा सदरा आणि लेंगा घातलेला! या संपूर्ण पोषाखावर मतदान जागृतीचा संदेश लिहिलेला पाहायला मिळत होता. डोक्यात टोपी त्यावरही मतदान करा, असा संदेश लिहिलेला. तेच बापूराव गुंड! शिट्टी वाजवून ते लोकांचे लक्ष वेधून घेत होते. मतदान करा, असा संदेश ते देत होते.पुण्यातील फुरसुंगीपासून या अवलियाने बाईकवरून प्रवास सुरू केला आहे. बाईकवरही मतदान जागृतीचे संदेश जागोजागी लिहिलेले पाहायला मिळत होते. गेल्या ३५ वर्षांपासून बापूराव गुंड यांनी मतदान जागृतीचा प्रयोग स्वखर्चातून सुरू केला आहे. गुंड हे कापड विक्रेते आहेत. मात्र निवडणुकांत मतदानाचा घटलेला टक्का त्यांच्या जिव्हारी लागला. सरकार निवडताना सर्वच जनतेने पुढे यावं, असं त्यांचं मत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच लोकसभा या सर्वच निवडणुकांमध्ये ते मतदान जागृतीसाठी घराबाहेर पडतात.गुंड यांच्याकडे असणाऱ्या बाईकमध्ये ते स्वत:च्या खिशातील पैशाने पेट्रोल टाकतात. मंगळवारी ते पुण्यातून जागोजागच्या गावांत मतदान जागृती करत साताºयात आले होते. साताºयातून ते कºहाड, कोल्हापूरकडे जाणार होते. ३० ते ३५ दिवसांच्या दौºयात बसस्थानक, मंदिरात ते मुक्काम करतात. दुसºया दिवशी पुन्हा ‘आय विल ओट...तुम्हीही मतदान करा,’ असा संदेश देत प्रवास करतात.तेव्हाच प्रवास थांबेलजोपर्यंत देशात ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत १०० टक्के मतदार मतदान करणार नाहीत, तोपर्यंत ही जागृतीची मोहीम सुरूच ठेवणार आहे, असे बापूराव गुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.