शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव शहर वीज पुरवठ्याबद्दल स्वयंपूर्ण : शशिकांत शिंदे

By admin | Updated: June 21, 2017 15:06 IST

नवीन उच्चदाब शक्तीच्या ट्रान्सफॉर्मरचे लोर्कापण

आॅनलाईन लोकमतकोरेगाव , दि. २१ : कोरेगाव शहराची वीज समस्या कायमस्वरुपी संपविण्यात आली आहे. अथक परिश्रमानंतर औद्योगिक वसाहत उपकेंद्रामध्ये नवीन उच्चदाब शक्तीचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाला असून, त्याद्वारे शहराला अखंडीत वीज पुरवठा केला जात आहे. स्मार्ट सिटी योजनेतील विजेबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, शहर आता वीज पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण बनले आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंंदे यांनी केले. महावितरण कंपनीच्या कोरेगाव औद्योगिक वसाहत उपकेंद्रामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या नवीन उच्चदाब शक्तीच्या ट्रान्सफॉर्मरचे लोर्कापण आ. शिंंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, कार्यकारी अभियंता सुनील माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. वाय. देशपांडे, उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी, सहाय्यक अभियंता संतोष तळपे उपस्थित होते. आ. शिंंदे पुढे म्हणाले, सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत शहरवासियांनी आंदोलन केले होते, त्याची दखल घेत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबत मी स्वत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोललो होतो, त्यांनी मंजुरी दिल्याने अवघ्या एक वर्षाच्या आत काम मार्गी लागले असून शहराला आता २४ तास अखंड वीज पुरवठा होणार आहे. महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी मनोगतामध्ये आव्हानात्मक काम लवकर केल्याचे समाधान असल्याचे सांगितले. अभिजित महामुनी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गणेश होळ यांनी सूत्रसंचालन केले. संतोष तळपे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक संजय पिसाळ, नागेश कांबळे, किशोर बर्गे, महादेव जाधव, नगर विकास कृती समितीचे राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, सचिन बर्गे, गणेश धनवडे, राजेंद्र दिसले, सुभाष धनवडे, प्रशांत खिरे, अमोल जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आता २४ तास पाणी देण्याचा प्रयत्न

विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण झाल्याने आता शहरवासियांना २४ तास मुबलक पाणी देण्याचाही प्रयत्न सुरु आहे. शहरात दजेर्दार एलईडी पथदिव्यांबरोबरच सौरउर्जा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेकविध चांगले उपक्रम हाती घेतले असल्याचेही आ. शिंंदे यांनी निदर्शनास आणून दिले.