शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हा तर नगराध्यक्षांचा नाकर्तेपणा लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:38 IST

कऱ्हाड : जनशक्ती आघाडीने केलेल्या विशेष सभा रद्द करण्याच्या मागणीला सभागृहात सहमती द्यायची आणि त्यानंतर पत्रक काढून त्यावर ...

कऱ्हाड : जनशक्ती आघाडीने केलेल्या विशेष सभा रद्द करण्याच्या मागणीला सभागृहात सहमती द्यायची आणि त्यानंतर पत्रक काढून त्यावर टीका करायची, ही बाब सभागृहाची व कऱ्हाडकरांची फसवणूक करणारी आहे. खोटारडेपणाचा कळस गाठणाऱ्या नगराध्यक्षांना त्या पदाचे पावित्र्य जपण्याचेही भान राहिलेले नाही. त्यांनी उधळलेली मुक्ताफळे म्हणजे स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्याचा केविलवाणा प्रकार आहे, असा आरोप महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी विशेष सभेवरून केलेल्या आरोपाला स्मिता हुलवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, जनशक्तीची मागणी चुकीची होती, तर त्या मागणीचे तुम्ही सभेत समर्थन का केले? काही तरी थातुरमातुर उत्तर देऊन लोकांची, पालिकेची व नगरसेवकांची दिशाभूल करणे थांबवावे. बहुमताने कोविडच्या उपाययोजनांची बैठक घेण्यास आपल्याला भाग पाडले. त्याची तुमच्यावर नामुष्की आली. आपण घेतलेली सभा रद्द करावी लागली व आम्ही मागणी केली म्हणून सभा तुम्हाला घ्यावी लागली आहे. तुम्ही फक्त लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून मिरविण्यातच समाधानी राहा. आजवर आम्ही तुम्हाला समजून घेतले. शहराच्या हितासाठी बऱ्याच वेळा तुमच्या चुकांना पाठीशी घातले. तुम्ही जनतेतून नगराध्यक्षा झालात, त्याचा मान ठेवला. मात्र त्याचे भान न ठेवता आपण मन मानेल तसे वागत आहात; त्यामुळे आपल्याला आता इथून पुढे जशास तसे उत्तर मिळेल.

स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी नगराध्यक्षांनी विशेष सभा घेतली. सभेची कार्यवाही सात दिवसात पूर्ण करणे, तसे ठराव करणे हे नगराध्यक्षांचे अधिकार आहेत. त्यात प्रशासनाचा काही संबंध नाही. सभेचे प्रोसिडिंग अपूर्ण आहे त्यामुळे विशेष सभा घेतली, असे आपण स्वतःहून कबूल केले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव नाही, हे स्पष्ट होते.

तुम्हाला वाटते की, आम्ही ठरवून भांडण केले, तर पाच वर्षे सभागृहामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त होऊन तुमचा झालेला दंगा सगळ्या शहराने अनुभवला आहे. आपण काय आहात अन्‌ काय नाही हे साऱ्यांनाच माहीत झाले आहे. तुम्ही काम करत असल्याचे सांगत आहात,पण तुम्ही तर मिरवण्यासाठीच काम करतात. कोणाचा मृत्यू झाला असला आणि त्या ठिकाणी भेट दिली, तर त्याचे फोटो काढता, हे मिरवणे नाही तर काय आहे? कोरोनासाठी आपण फिरला असे म्हणता. पण ते फिरणे नव्हते, तर ते निव्वळ मिरवण्यासाठी फिरत होता, हे आम्ही वेळोवेळी सिद्ध केले आहे, असेही हुलवान यांनी म्हटले आहे.