शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांकडून मारहाणीचा प्रयत्न

By admin | Updated: June 30, 2015 00:19 IST

जतमध्ये पथकाला दमदाटी : तिघांवर गुन्हा दाखलचे आदेश

जत : तालुक्याच्या पूर्वभागात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर शनिवारी रात्री कारवाई करत असताना मल्लिकार्जुन हणमंत लोणी (रा. बालगाव), अशोक ईश्वर बिळूर (रा. सिध्दनाथ), तम्मा मानकू कुलाळ (रा. खंडनाळ) या तिघांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करून दमदाटी केली. शासकीय कामात आडथळा आणल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र तहसीलदार अभिजित पाटील यांनी जत व उमदी पोलिसांना देऊन संबंधित तलाठी यांना यासंदर्भात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती. जत पूर्व भागातून चोरून वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी तहसीलदार, गावकामगार तलाठी आर. एच. कोरवार, कोतवाल सुभाष कोळी व इतर कर्मचारी शनिवारी रात्री गेले होते. मल्लिकार्जुन लोणी, अशोक बिळूर, तम्मा कुलाळ यांच्या नंबर नसलेल्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना या तिघांनी कारवाईस विरोध करून शासकीय कामात अडथळा आणला, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरील तीनपैकी एक ट्रॅक्टर उमदी पोलीस स्टेशन व दोन ट्रॅक्टर जप्त करून जत तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले आहेत. दरम्यान, मल्लिकार्जुन लोणी यांच्याविरोधात तलाठी नितीन कुंभार यांना उमदी पोलिसात, तर अशोक बिळूर व तम्मा कुलाळ यांच्या विरोधात तलाठी डी. वाय. कांबळे यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल करावी, असा आदेश दिला आहे. (वार्ताहर)जत तहसीलदार, तलाठ्यांविरुध्द मारहाणीची तक्रारजतचे तहसीलदार अभिजित पाटील, तलाठी आर. एच. कोरवार आणि त्यांच्या जीपचालकाने काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार सुरेश पाटील (रा. खंडनाळ, ता. जत) यांनी जत पोलिसांत दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार दि. २७ रोजी रात्री साडेदहाच्यादरम्यान खंडनाळ ते लमाणतांडा रस्त्यावरून सुरेश मोटे व हरिबा आवटी यांच्यासमवेत दुचाकीवरून जात असताना, दरीबडची-पांढरेवाडी फाट्यावर तहसीलदार पाटील, तलाठी कोरवार व जीपचालक थांबले होते. त्यावेळी वाळू व्यवसायावर टीपणी करत तलाठी कोरवार यांनी गळ्यातील वीस ग्रॅम सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर कोरवार, तहसीलदार पाटील आणि जीप चालकाने काठीने मारहाण केली. सोबत असलेल्या मोटे व आवटी यांनाही मारहाण केली. जबरदस्तीने जीपमध्ये घालून संख येथे नेले. कोळगिरी येथे पहाटे पाच वाजता सोडले.