शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खुन्नसच्या कारणावरून युवकावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

दोघांना अटक ; जखिणवाडीतील घटनेने काहीकाळ तणाव कराड : खुन्नस देत असल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार करण्यात आले. जखीणवाडी, ...

दोघांना अटक ; जखिणवाडीतील घटनेने काहीकाळ तणाव

कराड : खुन्नस देत असल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार करण्यात आले. जखीणवाडी, ता. कराड येथे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

देवेंद्र अशोक येडगे (वय 20, रा. जखीणवाडी) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे, तर अक्षय ऊर्फ आकाश जयसिंग बाबर (वय 25) व उत्सव उत्तम शिंदे (वय 19, दोघेही रा. जखीणवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखीणवाडी येथे उत्सव शिंदे व आकाश बाबर थांबले असताना तेथे देवेंद्र येडगे गेला. त्यावेळी तू येथे का आलास असे म्हणून शिंदे व बाबर यांनी चाकूने व दगडाने येडगेला मारहाण केली. त्यानंतर संशयित दोघेही तेथून पळून गेले. दरम्यान, जखमी अवस्थेत देवेंद्र येडगे कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना कृष्णा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली. त्यानुसार संशयितांच्या मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबतची फिर्याद जखमी देवेंद्र येडगे यांनी शहर पोलिसांत दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील करीत आहेत.