शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियाचा तलाठ्यावर हल्ला

By admin | Updated: February 24, 2016 00:33 IST

गंभीर जखमी : ताथवडा येथे दगडाने मारहाण; हल्लेखोराचे पलायन

फलटण : वाळूचे डेपो जप्त करण्यासाठी गेलेल्या गावकामगार तलाठ्यावर वाळूमाफियाने दगडाने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार फलटण तालुक्यातील ताथवडा हद्दीत घडला असून, हल्लेखोराने पलायन केले आहे.आत्माराम नानासाहेब गिऱ्हे असे हल्ला झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार विजय पाटील यांनी सोमवारी (दि. २२) भरारी पथकासोबत ढवळ, वाखरी, ताथवडा भागात गस्त घालून बेकायदा वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले होते. कारवाई करीत असताना गावांमध्ये जागोजागी वाळू चाळून त्याचे डेपो लावलेले आढळले होते. हे वाळू डेपो जप्त करून ताब्यात घेण्यासाठी ताथवडा येथे तलाठी आत्माराम गिऱ्हे व कोतवाल दत्तू जाधव हे मंगळवारी सकाळी पंचनामा करीत असताना ताथवडा पुलाजवळ गेले होते. तेथे मोटारसायकलवरून आलेला वाळूमाफिया बाळू कल्याणकर खराडे याने ‘ही जमीन माझी आहे,’ असे सांगितले. तेव्हा गिऱ्हे यांनी ‘पंचनामा करावा लागेल,’ असे सांगताच बाळू खराडे याने गिऱ्हे यांना दगडाने ठेचून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व तेथून पळून गेला. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)