शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

स्मरणशक्तीवर हल्ला ‘जंक फुड’चा

By admin | Updated: June 13, 2015 00:28 IST

आहारतज्ज्ञांचे मत : वेळीच उपाय होणे आवश्यक--‘हेल्दी फूड’चा छान-छान डबा- दोन

प्रगती जाधव-पाटील - सातारा  -मोठ्या प्रमाणावर कॅलरीज आणि कमी प्रमाणात पौष्टिक मूल्य असणाऱ्या जंक फुडच्या सेवनाने महिला आणि मुलांना अनेक आजार जडत आहेत. मुलांमध्ये मेमरी लॉस आणि मुलींच्या प्रजनन व्यवस्थेवरच या अन्न पदार्थाने घाला घातला आहे. याविषयी वेळीच उपाय होणे आवश्यक असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्त करतात.बालवयात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असते; पण याच वयात जर जंक फुडची सवय लागली तर ते धोकादायक ठरू शकते. मुलांना सामाजिक आणि व्यवहारिक वर्तन शिकविण्यासाठी बालवय महत्त्वाचे असते. साधारण तीन वर्षांपासूनच मुलांमध्ये हे गुण वाढीस लागतात; पण जंक फुडच्या सवयीने मुलं एकलकोंडी आणि स्वमग्न राहतात, असे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. जंक फुड खाण्याने अनैसर्गिक जाडी वाढते. यामुळे येणारी स्थूलता आणि जडत्व नैसर्गिक चपळाईवर मात करते. त्यामुळे ही मुलं मंदगतीने वाढीस लागतात. त्यामुळे ही मुलं वर्गात आणि समाजात वावरतानाही शुन्यात राहत असल्याचे दिसते. इतरांच्या बरोबरीने आपल्याला हालचाली करता येत नसल्याची बोचणी या मुलांना स्वत:विषयी नकारात्मक विचार करायला प्रवृत्त करते.जुनाट आजारांनाही नव्याने उभारी देण्याचे काम जंक फुड करते. लहान मुलांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार या अन्न पदार्थांमुळेच मुलांना जडले असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. (सात्विक अन्न म्हणजे काय? पाहा उद्याच्या भागात.)‘जंक फुड’ लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. हे वारंवार सांगूनही जोपर्यंत मी अनुभव घेत नाही तोपर्यंत शहाणा होणार नाही, अशी भूमिका पालकांची दिसते. ‘जंक फुड’पेक्षा आपल्या मातीत येणारे आणि उगवणारे अन्नपदार्थ खाण्यासाठी पालकांनी मुलांना प्रवृत्त करावे. यात शाळेतील खाऊच्या डब्याची जबाबदारी शाळांनी घेणे आवश्यक आहे.- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा घरातील अन्न पदार्थ खाणे उपयुक्त आहे. हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला म्हणून आम्ही शाळेत मुलांना भाजी पोळी आणणे सक्तीचे करतो. अनेकदा विद्यार्थ्यांनी आणलेला डबा तपासतो. जर त्यात काही बाहेरील अन्न पदार्थ असतील, तर त्याविषयी आम्ही पालकांशी संवाद साधून त्यांना समज देतो. एकत्र जेवणामुळे आपल्या नावडीचा डबा असला तरीही मुलं ते खातात आणि त्यांचे चांगले पोषण होते.- अमित कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूल, साताराप्रजनन व्यवस्थेवर होतोय परिणाम‘जंक फुड’ मुलींसाठीही धोकादायक आहे. या अन्नाच्या सेवनाने गर्भाशयावर गंभीर परिणाम होत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. त्यामुळे प्रजनन व्यवस्थेवर ताण येणे, गर्भाशयाची व्यवस्थित वाढ न होणे, गर्भ वाढीला अडचणी निर्माण होणे यासारखे अनेक आजार मुलींना जडत असल्याने जंक फुड मुलींसाठी धोक्याचेच म्हणून गणले गेले आहे.५चला टाळूया ‘जंक फुड’‘जंक फुड’ खाण्याने अपाय होत असल्यामुळे अनेक घरांमधून ते हद्दपार करण्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनीच जंक फुड टाळण्याचा निर्धार करू .एकाग्रता होते नष्टअन्न ग्रहण केल्यानंतर ती पाचनसंस्थेत जाते. त्यानंतर पाचक रस त्यात मिसळून हे खाललले अन्न आपल्याला पचते. त्यातूनच मग पोषक तत्त्व शरीराला आणि मेंदूला पुरविली जातात. जंक फुडच्या सेवनाने तयार होणाऱ्या रसायनामुळे मेंदूचे काम शिथील होते. याचा सर्वाधिक फटका एकाग्रतेवर होतो. मेंदू तल्लख नसल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला बाधक ठरते.