शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रोकडसह ‘एटीएम’च लंपास

By admin | Updated: March 3, 2017 23:34 IST

मलकापुरात खळबळ; महामार्गाच्या सेवा रस्त्यावर चोरट्यांचा डल्ला

मलकापूर : दीड लाखाच्या रोकडसह एटीएम मशीनच चोरट्यांनी लंपास केले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गालगत असलेल्या येथील लाहोटीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. सतत रहदारी असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.मलकापूर येथील लाहोटीनगरजवळ स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. शाखेच्या शेजारी उपमार्गालगत असलेल्या इमारतीत याच बँकेचे काही वर्षांपूर्वी एटीएम सुरू करण्यात आले आहे. या एटीएममधून ग्राहकांना बँकेची सुविधा पुरविण्यात येते. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह परिसरातील नागरिकही पैसे काढण्यासाठी या एटीएमचा वापर करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे कॅश भरणाऱ्या कंत्राटदार कंपनीने एटीएम मशीनमध्ये कॅश भरणा केल्यामुळे हे मशीन सुरूच होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी मशीनमधील रोकडसह मशीनच लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी आसपासच्या व्यावसायिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती तत्काळ कऱ्हाड शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. संबंधित एटीएम रात्री दोन वाजता बंद पडल्याची आॅनलाईन नोंद बँकेमध्ये झाली आहे. त्यामुळे दोन वाजताच चोरट्यांनी ते मशीन तेथून उचलले असावे, अशी शक्यता आहे.पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. घटनास्थळावर दाखल झालेल्या श्वानाने एटीएमपासून उपमार्गापर्यंत माग काढला. तेथेच श्वान घुटमळले. त्यामुळे चोरटे वाहनाने पसार झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मलकापुरातील अनेक एटीएम मशीनला सीसीटीव्ही कॅमेरे किंवा वॉचमन नसल्यामुळे संबंधित एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर येत आहे. मशीनला सुरक्षाच नाहीस्टेट बँक आॅफ इंडियाच्या संबंधित एटीएमला कसलीच सुरक्षाव्यवस्था नाही. एटीएममध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. तसेच त्याठिकाणी रक्षकही नाही. एटीएमच्या मशीनचे वजन सुमारे तीनशे ते साडेतीनशे किलोपर्यंत असते. मशीन उचलण्यासाठी किमान सहा माणसांची आवश्यकता असते. मशीन बसविताना त्याला कसलेही फाउंडेशन अथवा फिटिंग करण्यात आलेले नव्हते. मशीन केवळ जमिनीवर ठेवून त्याला कनेक्शन जोडण्यात आले होते.