शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड उत्तरच्या आमदारांना घरी बसवा

By admin | Updated: August 3, 2014 01:53 IST

उंब्रज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात बाळासाहेब पाटील यांच्यावर खरमरीत टीका

उंब्रज : ‘कऱ्हाड उत्तरचे आमदार विधानसभेत बोलताना कधीही दिसले नाहीत. तेव्हा अशा मुक्या-बहिऱ्या लोकप्रतिनिधीला घरी बसविणेच योग्य आहे,’ अशी खरमरीत टीका आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आली. उंब्रज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा झाला. यावेळी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, कऱ्हाड तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार शेट्टी म्हणाले, ‘साखरसम्राट हे राक्षस आहेत. त्यांना संपविण्यासाठी लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचे ब्रह्मास्त्र दिले आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करून सर्वसामान्यांच्या मानगुटीवर गेली पंधरा वर्षे बसलेले आघाडीचे सरकार पाडावे. साखर कारखान्याच्या माध्यमातून बांडगुळे तयार झाली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना अज्ञानात ठेवण्याचे काम केले आहे. येथील शेतकरी साखर कारखान्याकडून मिळणारी साखर व चेअरमनकडून मिळणारे चहा व बिस्कीट या पुरताच मर्यादित होता; परंतु आता शेतकरी जागे झाले आहेत.’ प्रदेशाध्यक्ष खोत म्हणाले, ‘लोकशाहीत झोपडपट्टीत राहणारा माणूस देशाचा राजा ठरवू शकतो. येथे शेतकरी विरोधात गेला की त्याला अडवले जातेय. वाळूमाफिया, गुंडांना हाताशी धरले आहे. घोटाळे करणाऱ्या सगळ्यांना येरवड्याच्या तुरुंगात घालण्यासाठी व आरपारची लढाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.’ मनोज घोरपडे म्हणाले, ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखाने उसाला दर देत आहेत. परंतु सातारा जिल्ह्यातील कारखाने दर जाहीर करत नाहीत. आम्ही येथील संघटित दहशतवाद मोडून काढणार आहे. शेतकऱ्यावर अन्याय करू दिला जाणार नाही. खपवूनही घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही विरोधकांचा दबाव घेत नाही. वेळ पडल्यास दबाव टाकू शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भविष्यात दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत.’ दीपक साबळे यांनी प्रास्ताविक केले. अंजन घाडगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)