शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर न फिरकणाऱ्यांना जाब विचारा

By admin | Updated: October 17, 2016 00:55 IST

शंभूराज देसार्इंचा पाटणकरांना टोला : ईबीसी सवलत लोकनेत्यांनी आणली

पाटण : ‘विधानसभेत पुत्राचा पराभव झाला म्हणून जनतेवर रुसून तोंड लपविणाऱ्या माजी मंत्र्यांनी गेली दोन वर्षे तालुक्यातील जनतेकडे पाठ फिरविली आहे. पितापुत्र लोकांची विचारपूस करायलाही वाडी-वस्तीवर गेले नाहीत. आता निवडणुका आल्या की त्यांची पावले वळू लागली असून, तालुक्यातील जनतेनेच पाटणकरांना गावच्या वेशीवरच अडवून त्यांना जाब विचारला पाहिजे,’ असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगावला. दरम्यान, ‘सध्या वाढविण्यात आलेली ईबीसी सवलत शिक्षणमंत्री असताना बाळासाहेब देसार्इंनीच आणली,’ असेही ते म्हणाले. मोरणा विभागातील गुरेघर, पाचगणी, काहीर, दिक्षी, माणगाव, मोरगिरी, गोकूळ तर्फ पाटण, बाहे येथील गावांसाठी १२ कोटींच्या रस्ते विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार देसाई म्हणाले, ‘मोरणा भागातील जनता पाटणकरांना आता मते मागू देणार नाही. काही वर्षांतच पाटण तालुक्यात विणलेले रस्त्याचे जाळे व विकास जिल्ह्यातील, राज्यातील लोक बघायला येतील. तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र झटताना स्वत:चे वैयक्तिक नुकसान झाले तरी चालेल; पण लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता. तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मोकळ्या हाताने कधीही पाठविले नाही. माजी आमदार पाटणकर हे गेल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत विधानसभेत कधी बोलल्याचे ऐकले नाही. वाड्यात बसून कामे होणार नाहीत, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास रविराज देसाई अ‍ॅड. मिलिंद पाटील, बशिर खोंदू तसेच आटोली, पाचगणी, धावडे, कोकिसरे, पेठशिवापूर, गोकुळ तर्फ पाटण, अंबेघर तर्फ मरळी, काहीर गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नथुराम कुंभार यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी) मंत्री राहिलेल्यांना फरक समजला नाही... ‘राज्याचे बांधकाममंत्री पद भोगलेल्या विक्रमसिंह पाटणकर यांना रस्त्याचे खड्डे मुजविणे आणि संपूर्ण रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे यातील फरक समजत नाही. त्यामुळे माझ्यावर केवळ खड्डे मुजविण्याचे काम करता म्हणून ते आरोप करत आहेत. तेव्हा पाटणकरांनी माझ्याकडून रस्त्यांच्या कामाची व त्यावर पडलेला निधी याची यादी घ्यावी आणि अभ्यास करावा,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले. नरेंद्र पाटील यांच्या बतावण्या.. ढेबेवाडी विभागात लाखोंची कामे केल्याच्या बतावण्या एक आमदार करत असून, आमदार देसाई यांनी केवळ एका टप्प्यात ८ कोटींची कामे ढेबेवाडी विभागात दिली. ती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे पुरावे देण्याची गरजच नाही, असे उपसभापती डी. आर. पाटील यांनी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव न घेता सांगितले. दाखल्यांमुळे तरुणांना नोकऱ्या... गृहमंत्री असताना कोयनेच्या भूकंपबाधित कुटुंबासाठी भूकंप दाखला देण्याचा कायदा लोकनेत्यांनी केला. मात्र, १९९५ सालापासून दाखले देण्याचे काम बंद झाले. त्यानंतर अनेक वेळ आमदार व एकवेळा मंत्री झालेल्या पाटणकरांनी दाखले सुरू करण्यासाठी काहीच केले नाही. मी आमदार झाल्यानंतर २०१४ सालापासून दाखले पुन्हा मिळू लागले आहेत. त्यामुळे अनेक तरुण पोलिस व शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती होऊ होत आहेत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.