वडूज : ‘कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत प्रत्येक नागरिक स्वत:च्या जिवाला घाबरून घरी बसला होता. अशावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा स्वयंसेविका दारोदारी जात होत्या. त्यांच्या या कामाचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे,’ असे प्रतिपादन माजी सभापती संदीप मांडवे यांनी केले.
खटाव पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिनानिमित्त आयोजित गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती जयश्री कदम, माजी सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, संतोष साळुंखे, डॉ. युन्नूस शेख, डॉ. संतोष मोरे, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. कोंडिबा नांदे, राणी बहेनजी, दीपाली गोडसे उपस्थित होते.
संदीप मांडवे म्हणाले, ‘आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ठराव करण्यात आला होता. हा ठराव पुढे पाठविण्यात आला. मात्र तत्कालीन युती शासनाने हा ठराव गांभीर्याने घेतला नाही. आता सरकार बदलल्याने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. राणी बहेनजी यांनी स्वयंसेविकांना दैनंदिन आरोग्य, मनस्वास्थ्यासाठी प्रार्थना, व्यायाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्या संगीता दरेकर, सुरेखा निकाळजे, शबाना तांबोळी, रांगोळी स्पर्धेतील विजेत्या आयेशा मुलाणी, मनीषा निकम, ज्योती यादव, शुभांगी काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास गट प्रवर्तक सुमित्रा गोडसे, शोभा चिंचकर, रोहिणी जगदाळे, वैशाली जाधव, शीला कुंभार, अनिता येवले, सरोजिनी कुंभार, वैशाली गुजर, अंबिका लुकडे उपस्थित होत्या. डॉ. युनूस शेख यांनी प्रास्ताविक केले. वीरधवल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण देशमुखे यांनी आभार मानले.
१२वडूज-आशा
वडूज येथे आयोजित आशासेविका मेळाव्यात स्पर्धेतील विजेत्या महिलांचा सभापती जयश्री कदम-पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, डॉ. युनूस शेख उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)