शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: सातारा जिल्ह्यात कुणबीच्या तब्बल दीड लाख नोंदी, गॅझेटच्या अंमलबजावणीचे आव्हान 

By दीपक देशमुख | Updated: September 4, 2025 19:51 IST

संशोधनासाठी इतिहास, मोडीलिपी तज्ज्ञांच्या समितीची गरज

दीपक देशमुख सातारा : आतापर्यंत सातारा जिल्ह्यातच दीड लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्यांचा मराठ्याशी वंशावळीला निश्चित फायदा होऊ शकतो. परंतु, मराठा समाजाला ओबीसीचा लाभ होण्यासाठी सातारा गॅझेटमध्ये कुणबी व मराठे एकच असल्याचे पुरावे शोधून ते सिद्ध करण्याचे आव्हान तज्ज्ञांच्या समितीसमोर आहे. मुंबईतील मराठा आंदोलकांना सातारा गॅझेटियर लागू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. तथापि, सातारा आणि औंध गॅझेटचा सखोल अभ्यास करून कुणबी व मराठे हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान शासनासमोर आहे. त्यामुळे शासनाला दिलेल्या मुदतीत याचा अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी लागणार आहे. मराठा समाजासाठी कुणबी नोंदी करण्यासंदर्भात सरकारने सातारा गॅझेट लागू करण्याचे आश्वासन दिले असून, त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना ३१ डिसेंबरपर्यंत अभिलेख व नोंदी शोधण्यासाठी मुदवाढ दिली आहे. सातारा गॅझेट आणि औंध गॅझेटमध्ये मराठ्यांची तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक स्थिती विशद करण्यात  आली आहे. त्या सर्व जुन्या नोंदीचा अभ्यास करून त्याचा अहवाल  राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये मराठा व कुणबी सिद्ध करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला इतिहास तज्ज्ञांची तसेच मोडी लिपी तज्ज्ञांचीही आता मदत घ्यावी लागणार आहे.

१५० सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीला तब्बल १७०० पानांच्या इंग्रजी भाषेतील गॅझेटचा किस पाडवा लागणार आहे. 

पुराव्यासाठी उपयोग १८८१ सालीच्या सातारा गॅझेटमध्ये  जिल्ह्याशी संबंधित सरकारी अधिसूचना, नियम, आदेश आणि माहिती असणार आहे. यामध्ये जमीन व्यवहार, शासकीय योजना यांची माहिती असणार आहे. 

राज्य शासनाच्या सूचनानुसार शोधलेल्या नोंदी व अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सातारा गॅझेटियरबाबत शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार जिल्ह्यामध्ये त्वरित कार्यवाही सुरू करण्यात येईल. - नागेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारीशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. काहीना काही तरी पदरात पडले आहे. सातारा गॅझेट लागू होईल तेव्हा नक्कीच आरक्षणाचा मराठाबांधवांना लाभ मिळणार आहे. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी एकजूट दाखवली. त्याचे हे फळ आहे, असे मला वाटते. - वैभव चव्हाण, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सातारामराठा समाजाचा संघर्ष सार्थकी लागल्याचा आनंद आहे. सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केले आहे. सातारा व औंध गॅझेट लवकरच लागू होईल ही अपेक्षा. ही जबाबदारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतल्यामुळे त्यांची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. - बापू क्षीरसागर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सातारा