शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अरव, केतकीच्या उपचारासाठी थिरकणार पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:06 IST

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आई-वडिलांचा रक्तगट समान असल्यास अपत्याच्या जन्मावेळी विशिष्ट इंजेक्शन द्यावे लागते; पण ते दिले न गेल्याने अरव चव्हाणला ऐकू व बोलता येत नाही. तसेच केतकी भोईटे या विवाहितेचे दोन्ही पाय प्रसूती काळात निकामी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांच्या आर्थिक मदतीसाठी अठरा डान्स अ‍ॅकॅडमीचे कलाकार ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आई-वडिलांचा रक्तगट समान असल्यास अपत्याच्या जन्मावेळी विशिष्ट इंजेक्शन द्यावे लागते; पण ते दिले न गेल्याने अरव चव्हाणला ऐकू व बोलता येत नाही. तसेच केतकी भोईटे या विवाहितेचे दोन्ही पाय प्रसूती काळात निकामी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांच्या आर्थिक मदतीसाठी अठरा डान्स अ‍ॅकॅडमीचे कलाकार मंगळवार, दि. ५ रोजी शाहू कलामंदिरमध्ये एकत्र येऊन थिरकणार आहेत.साताऱ्यातील कोमल पवार यांच्या हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी गेल्यावर्षी सुमारे ५४ लाखांचा खर्च होता. तेव्हा कोमल पवार यांच्या उपचारासाठी याच सर्व कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला होता. त्यातून खूप मोठी मदत झाली.त्याचप्रमाणे अरव चव्हाण हा अडीच वर्षीय बालक आहे. त्याच्या आई-वडिलांचा रक्तगट समान आहे; पण अरवच्या जन्मावेळी इंजेक्शन दिले नाही. त्याचा परिणाम अरवला आयुष्यभर सहन करावा लागत आहे. त्याला ऐकू किंवा बोलता येत नाही. इतर मुलांप्रमाणे अरवला ऐकता, बोलता यायला हवे, अशी त्याच्या आई-वडिलांचीअपेक्षा आहे. त्याला व्यवस्थित करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे; पण कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.अरवप्रमाणेच केतकी भोईटे यांची अवस्था आहे. प्रसूतीकाळात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. एकवर्षीय सोनुल्याबरोबर आपणही खेळावे, असे त्यामाऊलीचे स्वप्न आहे. तिच्या कुटुंबीयांचीही हलाखीचीपरिस्थिती असल्याने शस्त्रक्रिया करता येत नाही. केतकी भोईटे यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठीसाताºयातील कलाकार एकत्र येत आहेत.अरव आणि केतकी यांच्यासाठी साताºयातील शाहू कलामंदिरमध्ये मंगळवार, दि. ५ रोजी ‘मेगा चॅरिटी शो’ आयोजित केला आहे. यासाठी साताºयातील सर्वच्या सर्व डान्स अ‍ॅकॅडमी एकत्र येत आहेत.कोमल पवारची उपस्थितीकोमल पवार यांच्यावरील हृदय अन् फुप्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी गेल्या वर्षी याच दिवशी याच अठरा डान्स अ‍ॅकॅडमी अन् दोनशे कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला होता. यातून सातारकरांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. कोमल पवार आता पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्या स्वत: मंगळवार, दि. ५ रोजी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन देणार आहेत.या अ‍ॅकॅडमी सहभागीएबीसीडी डान्स स्टुडिओ सातारा, अ‍ॅक्टिव्ह फ्लिपरस सातारा, मल्हार आॅरिअर्स, सातारा, पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी, सातारा, आकाश कला अ‍ॅकॅडमी, सातारा, ब्लॅक बॉईज् ग्रुप, सातारा, अपहोल्ड गु्रुप सातारा, फाईट क्लब सातारा, डान्स व्हिजन गु्रप सातारा, जयदेव भालेराव अ‍ॅकॅडमी, सातारा, नित्य साधना अ‍ॅकॅडमी, सातारा, बालगणेश कलामंच सातारा, के. जी. ग्रुप, सातारा, डी. व्हारस गु्रुप सातारा, डी२डी गु्रप सातारा, टीम आय गु्रप कºहाड हे संघ सहभागी होणार आहेत.