शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धावडशी यात्रेत मनोरंजनातून अंधश्रध्दा निर्मूलन

By admin | Updated: April 15, 2017 12:23 IST

अनोखा पायंडा: जादूटोणाविरोधी कायद्याचा लक्षवेधी चित्ररथ

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १५ : जिल्ह्यातील धावडशी हे अत्यंत महत्त्वाचे गाव. दरवर्षी वाघजाई देवीच्या यात्रेत प्रथेप्रमाणे देवीची पालखी अत्यंत दिमाखदार अशा मिरवणुकीने संपूर्ण गावात रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत वाजत-गाजत फिरवली जाते. यामध्ये अनेक सोंगे विविध ट्रॉली ट्रॅक्टरवर सजवली जातात. यावर्षी याला अत्यंत आगळे-वेगळे व सकारात्मक प्रबोधनाचे रूप देण्याचे गावातील नवजवान मित्र मंडळ, नेहरू युवा मंडळ व सिद्धिविनायक ग्रुप या तिन्ही तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी ठरवले.ज्या साताऱ्यातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि खरे तर जगभर गाजली त्याचे प्रणेते दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कल्पक नेतृत्वाच्या खडतर अशा अठरा वर्षांच्या संघषार्नंतर महाराष्ट्रात लागू झालेला जादूटोणा विरोधी कायदा नेमका काय आहे, याचा चित्ररथ करूनच त्या चित्ररथावरील स्टेज वर जिवंत बहारदार अशा चमत्कार सादरीकरणाचा देखावा सादर करण्यात आला. भोंदू मांत्रिकाच्या वेशात भगवान रणदिवे चित्तथरारक चमत्काराचे सादरीकरण करत होते तर कार्यकर्त्याच्या भूमिकेत प्रशांत पोतदार त्या चमत्कारा मागील विज्ञान व हात चलाखी ग्रामस्थांना समजावून सांगत होते.रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत रंगलेल्या या मिरवणुकीत जळता कापूर खाणे, जिभेतून त्रिशूळ आर-पार करणे, पाचशे टोकदार खिळ्यांच्या पाटावर झोपणे आदी चित्तथरारक चमत्कार पाहून धावडशीमधील हजारोंच्या संख्येने जमलेले ग्रामस्थ आश्चर्य चकित झाले. या सादरीकरणाला साथ होती, प्रभावी अशा चला गड्यांनो पाऊल टाका पुढ रं, उखडून टाकू अंधश्रद्धेची मूळ रं, गल्लो गल्ली गावामंधी, भोंदू बुवा वाढल,अशा बहारदार संगीतमय गीतांची. तरुणाई तर अगदी बेभान होऊन यावर नाचत होती.पुरोगामी विचारांचा जागर

जत्रा-यात्रांमध्ये खरे तर अशा प्रकारे पुरोगामी विचारांचा प्रबोधनात्मक देखावा तोही जिवंत दाखवण्याची साताऱ्यातील ही पहिलीच घटना ठरली. जत्रा-यात्रांमध्ये अशाप्रकारे आगळावेगळा समाज प्रबोधन पायंडा पाडणाऱ्या तरुण मंडळातील युवकांचे अंनिसच्या वतीने कौतुक करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या चित्ररथाचे कौतुक गावातील अनेक मान्यवर नागरिकांनी केले.