शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात जाळपोळ; राज्यमार्ग रोखला

By admin | Updated: August 12, 2014 23:18 IST

सोळाजणांना अटक : लिंगायत आंदोलनकर्ते संतप्त

कऱ्हाड : ओबीसी आरक्षणासह इतर मागण्यांसाठी येथे सुरू असलेल्या लिंगायत समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी पंढरपूर-गुहागर राज्य मार्गावर टायर पेटवून दिले. शहरातील पेट्रोलपंप चौकात रास्ता रोकोही केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन महिलांसह सोळा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.घटनेनंतरही समाजाचे भेदा चौकातील उपोषण सुरूच आहे. निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी दुपारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, तर सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, महाराष्ट्रात लिंंगायत समाजास लोकसंख्येवर आधारित अल्पसंख्याक दर्जा मिळावा व लिंंगायत धर्मास धर्ममान्यता मिळावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या वतीने शहरातील भेदा चौकात चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलन अधिक तीव्र होत असतानाच आज सायंकाळी पाचच्या सुमारास समाजाचे काही कार्यकर्ते शहरातील पेट्रोलपंप चौकात जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुहागर-पंढरपूर राज्यमार्ग अडविला. तसेच रस्त्यावर टायर पेटवून दिले. माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोन महिलांसह एकूण सोळा आंदोलकांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)फडणवीस आले अन्...‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मंगळवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. तसेच ‘तुम्ही तुमची ताकद दाखवून द्या, आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुमचा विषय नक्की मार्गी लावू,’ असे आश्वासन दिले. त्यानंतर फडणवीस उपोषणस्थळापासून बाहेर पडत असतानाच शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत रस्त्यापर्यंत गेले. तेथून ते तसेच चौकात गेले व जाळपोळीसह रास्ता रोको केला. चार उपोषणकर्त्यांवर उपचाररात्री उशिरा उपोषणकर्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुरगाप्पा खुमसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख काका कोयटे, श्रीकांत म्हमाणे व प्रमोद भाले यांची प्रकृती खालावल्यामुळे या तिघांनाही यापूर्वीच उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.