शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगार सचिन चव्हाणला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:29 IST

फलटण : फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला सचिन चव्हाण या अट्टल गुन्हेगारास रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून झिरपवाडीच्या हद्दीमध्ये पकडले. या कारवाईत सचिन चव्हाणने दोन कर्मचाऱ्यांवर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते दोघे जखमी झाले आहेत.याबाबत ...

फलटण : फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला सचिन चव्हाण या अट्टल गुन्हेगारास रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून झिरपवाडीच्या हद्दीमध्ये पकडले. या कारवाईत सचिन चव्हाणने दोन कर्मचाऱ्यांवर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते दोघे जखमी झाले आहेत.याबाबत माहिती अशी की, सचिन हनुमंत चव्हाण (वय ३३, रा. कुरवली खुर्द, ता. फलटण), सचिन भिसे व सचिन मदने या त्रिकुटाने गेल्या काही वर्षांमध्ये वाटमारी, दरोडे, खुनाचा प्रयत्न अशा गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमध्ये उच्छाद मांडला होता. फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये या त्रिकुटांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी सचिन भिसे याचा काही वर्षांपूर्वी फलटणमध्ये खून झाला होता. तर सचिन मदने बेपत्ता आहे. दोन साथीदारांच्या ताटातुटीमुळे सचिन चव्हाण एकटा पडला होता. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने स्वत:ची टोळी तयार केली होती.सचिन चव्हाण याने काही महिन्यांपूर्वी उपळवे येथील पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तत्कालीन परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या हातावर तुरी देऊन तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे सातारा स्थानिक गुन्हे शाखा, फलटण ग्रामीण व शहर पोलीस ठाणे त्याचा शोध घेत होते.दरम्यान, सचिन चव्हाण हा रविवारी सकाळी कुरवली खुर्द या त्याच्या घरी येणार असल्याची माहिती फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने त्याला पकडण्यासाठी परिसरात सापळा रचला.तो फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथे दुचाकीवरून जात असताना गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याने दुचाकी गिरवीच्या दिशेने दामटली. यानंतर पोलीस कर्मचाºयांनीही सिनेस्टाईल त्याचा थरारक पाठलाग केला असता गिरवी-फलटण रस्त्यावर असणाºया एका ढाब्यासमोर त्याला पकडले.यावेळी सचिन चव्हाणने पथकातील तुपे व जगदाळे यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. अशा अवस्थेतही तुपे व जगदाळे यांनी चव्हाणला पकडून ठेवले. यामध्ये तुपे व जगदाळे जखमी झाले. दरम्यान, सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली. त्यामुळे फलटण पोलिसांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडलेला आहे.पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोक्कान्वये कारवाईकाही वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध गंभीर गुन्ह्णांच्या सहभागामुळे सचिन चव्हाणवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केली होती. त्यामुळे सचिन चव्हाण बरीच वर्षे कारागृहात होता. मात्र, कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. राजकीय पाठबळामुळे सचिनवरील गुन्हे खपवून गेले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी पेट्रोल पंप लुटीच्या प्रकरणाने तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता.अनेक गुन्ह्यांची उकल होणारफरार असतानाही सचिन चव्हाण याचा अनेक गुन्ह्णांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. सचिनच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्णांची उकल होण्यास पोलिसांना मदत होणार आहे. तसेच सचिन चव्हाणला पकडणाºया फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकातील कर्मचाºयांना रिवार्ड मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हंकारे यांनी दिली आहे.